कोपरगाव तालुका
रघुनाथ रोहमारे यांचे अकाली निधन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील माजी आ. दादासाहेब रोहमारे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे माजी संचालक रघुनाथ गणपतराव रोहमारे (वय-६७) यांचे नुकतेच अकाली निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,दोन भाऊ, दोन मुले, एक मुलगी पुतणे असा परिवार आहे.
स्व.रघुनाथ रोहमारे पोहेगाव परिसरात एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते.त्यांच्यावर पोहेगाव येथे स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी राजकीय,शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांसह कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सचिन रोहमारे, आदींसह मोठ्या संख्येने पोहेगाव व परिसरातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.त्यांच्या निधनाने आ. आशुतोष काळे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.