कोपरगाव तालुका
गोकुलचंद विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.सदाशिव लोखंडे हे राहणार सौं प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव वकील संघचे माजी अध्यक्ष अड्.शंतनू धोर्डे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,चेअरमन चंद्रकांत ठोळे, हे राहणार आहे.या कार्यक्रमास पालक विद्यार्थी यांनी बहू संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एम.कांबळे यांनी केले आहे.