कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील..या पाणी योजनांसाठी मोठा निधी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील १३ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडून प्रशासकिय मान्यता देण्यात आली असून ४ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीतून या सर्व नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण होणार असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे २४.०९ लाख, घारी २४.५५ लाख,उक्कडगाव २४.९५ लाख, माहेगाव देशमुख २५ लाख, तिळवणी १७.३३ लाख, सडे २४.०८ लाख, देर्डे चांदवड २४.९८ लाख, टाकळी २४.९९ लाख, ओगदी ६९.१३ लाख,मढी बु.,१५९.३८ लाख, तसेच मतदार संघातील राहाता तालुक्यातील नपावाडी २४.८९ लाख, रामपूरवाडी २४.८८ लाख,रस्तापूर १९.२३ लाख या तीन गावांचा समावेश असून मतदार संघातील एकूण १३ गावातील पाणी पुरवठा योजनांना ४ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावात पाण्याची टंचाई जाणवत होती.त्यामुळे महिला माता भगिनींची त्यासाठी या गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण होणे गरजेचे होते.अनेक गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना रखडल्या होत्या.या योजना तातडीने पूर्ण होण्यासाठी ना.काळे यांचे प्रयत्न सुरू होते.त्या प्रयत्नातून जास्त लोकसंख्या असलेल्या अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यात त्यांना यश मिळाले असून या गावातील महिला भगिनींची यापुढे पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे.त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या २५ लाखाच्या आतील ११ पाणी पुरवठा योजना व २५ लाखाच्या पुढील २ पाणी योजना देखील ना.काळे यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्या आहेत.
यामध्ये कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे २४.०९ लाख, घारी २४.५५ लाख,उक्कडगाव २४.९५ लाख, माहेगाव देशमुख २५ लाख, तिळवणी १७.३३ लाख, सडे २४.०८ लाख, देर्डे चांदवड २४.९८ लाख, टाकळी २४.९९ लाख, ओगदी ६९.१३ लाख,मढी बु.,१५९.३८ लाख, तसेच मतदार संघातील राहाता तालुक्यातील नपावाडी २४.८९ लाख, रामपूरवाडी २४.८८ लाख,रस्तापूर १९.२३ लाख या तीन गावांचा समावेश असून मतदार संघातील एकूण १३ गावातील पाणी पुरवठा योजनांना ४ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षापासूनचा या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. त्यामुळे या सर्व गावातील नागरिकांनी व महिला भगिनींनी ना.काळे यांचे आभार मानले आहे.