संपादकीय
अशोकच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे,”केवळ बोटावर निभावले”
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा शिमगा नुकताच संपला आहे.या निवडणुकित नुसता मतमतांचा गलबला दिसून आला.आरोप-प्रत्यारोपांचा नुसता वैशाख वणवा पेटला होता.विदूषकी थाटाचे आरोप,वक्तव्य,हास्यांचे फवारे,आरोप-प्रत्यारोप यांची रेलचेल दिसून आली होती.राणाभीमदेवी वल्गना,बोलण्यात ताळतंत्र किमपी नाही.बोलण्याचे आचरट पराक्रम करणारे वाचाळवीर यांची या निवडणुकीत बहु मांदियाळी दिसून आली.मुद्याचे शेतकरी संघटना वगळता कोणी बोलताना दिसून आले नाही.असे असून या निवडणुकीत माजी आ.व विद्यमान सत्ताधारी भानुदास मुरकुटे यांच्यासह समर्थकांनी विजय संपादन केला असून त्यासाठी ते अभिनंदन करणे गरजेचे आहे.कारण काही असो त्यांनी लोकशाहीच्या चौकटीत राहून हा विजय मिळवला आहे.तसा तो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच साखर सम्राट कमी अधिक फरकाने मिळवतात त्यात आता काही नवे राहिले नाही.आता सर्वांनीच ‘ती’ कला गत ७० वर्षात आता ‘अर्थसाध्य’ केली आहे.
“भारतीय राजकारणात व्यक्तीपूजा अगर भक्तीचा एवढा प्रभाव आहे की,इतर कोणत्याही देशातल्या राजकारणात अशी भक्ती व व्यक्ती पूजा आढळणार नाही.धर्मात भक्तिमार्ग हा मुक्तीमार्ग बनू शकतो परंतु राजकारणात भक्तिमार्ग हा अध:पतनाचा आणि पर्यायाने हुकूमशाहीचा निश्चित मार्ग बनायला वेळ लागणार नाही” वर्तमानात पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात याचा अनुभव ऊस उत्पादक नक्कीच घेत आहे.त्याला श्रीरामपूर तालुका अपवाद नाही.या साखर कारखानदारीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खाजगी कारखानदारिला ‘नाक खाजवून’ आणि ‘वाकुल्या’ दाखवून मालक बनविण्याचे स्वप्न दाखवले होते.प्रत्यक्षात त्यांना गुलाम बनवले आहे.हे आता सत्तर वर्षातील वाटचालीत दिसून आले आहे.आता हे काटेरी झुडुपे वटवृक्षात रूपांतरित झाले आहे.त्यामुळे त्यास उपटून टाकणे एवढे सोपे राहिले नाही हेही तितकेच खरे आहे!
अशोक सहकारी साखर कारखान्याचे ११ हजार ७३६ इतके सभासद असून ते मतदानासाठी पात्र होते.२१ जागांसाठी ही निवडणूक संपन्न झाली आहे. आहे.पढेगाव,कारेगाव,टाकळीभान,वडाळा महादेव,उंदिरगाव असे पाच गट असून प्रत्येक गटात ३ असे १५ संचालक निवडून द्यावयाचे होते. तसेच उत्पादक सहकारी संस्था,बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था सभासदांनी निवडून द्यावयाचा एक प्रतिनधी,अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीचा एक प्रतिनिधी,दोन महिला प्रतिनिधी,भटक्या विमुक्त जाती व जमाती,विशेष मागास प्रवर्ग एक प्रतिनिधी असे २१ अधिक विरोधी गटाचे २१ संचालक आपले भविष्य आजमावत होते.या सर्व संचालकपदी सत्ताधारी गटाने मुसंडी मारली आहे.टाकळी भान गट वगळता सर्वत्र मोठ्या फरकाने ते विजयी झाले आहे.मात्र शेतकरी संघटनेला मिळालेली ०४ हजार २०० ते ०४ हजार ८०० दरम्यान मिळालेली मते सत्ताधारी गटाच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली आहे.शेतकरी संघटना वर्तमानपत्रे (?) वगळता प्रचार सभा,बॅनरबाजी,गाठीभेटी आदी बाबत कुठेही कमी पडली नाही. टाकळी भान या गटात माजी आ.भानुदास मुरकुटे या सासऱ्या विरुद्ध सुन श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ.वंदना मुरकुटे यांचा लढा हा राज्यात चर्चेच्या अग्रस्थानी गेला हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.या निवडणुकीत जी घराण्याच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली ती टाळता आली असती तर बरे झाले असते.त्यामुळे कोणीही सुज्ञांची मान शरमेने खाली गेली असल्यास नवल नाही.
निवडणुकीत पैसा आणि पैशातून निवडणूक हे सार्वत्रिक चित्र आता सर्व मान्य झाले आहे.त्यांना टक्कर देण्यासाठी त्यांच्या पॅनलच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्यासाठी शेतकरी संघटना यशस्वी झाली होती.त्यांना अपयश आले आहे हे खरे असले तरी ते सत्ताधाऱ्यांना अंतर्मुख करणारे ठरले आहे हें नव्याने सांगण्याची गरज नाही.खरे तर या निवडणुकीत एका मराठीतील म्हणीप्रमाणे शेतकऱ्यांची “धट्टी खट्टी गरिबी” तर दुसरीकडे “लुळी पांगळी श्रीमंती” प्रकर्षाने दिसून आली आहे.तरीही सभासदांचा प्रतिसाद हा लक्षवेधी आणि उत्साह वाढविणारा होता.तर सत्ताधाऱ्यांना मान खाली घालविणारा होता.हे दोन गावे वगळता सर्वत्र चित्र होते.
एक मात्र खरे आहे की,या निवडणुकीत माजी आ.मुरकुटे गटाला एवढे आव्हान निर्माण होईल असे स्वप्नातही वाटले नसेल.मात्र ही मोट बांधण्यात सर्वात महत्वाचे योगदान दिले आहे ते अर्थातच शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या वकील संघाचे माजी अध्यक्ष अड्.अजित काळे यांनी.म्हणून राजकारणात बाकी कार्यकर्ते दुर्लक्षून चालणार नाही.शेवटी राजकारण हि कला एकट्याने सर्व साध्य करण्याची नक्कीच नाही.प्रत्येकाला आपापल्या समिधा या यज्ञात अर्पण कराव्याच लागतात हे वेगळे सांगणे गरजेचे नाही.जसा तमाशाचा फड एकाच्याने उभा रहात नाही तसाच काहीसा प्रकार राजकारणाच्या बाबतीत आहे.त्यामुळे हा सर्व मेळ घडवून आणण्याचे काम अर्थात नेतृत्व म्हणून एकाला करावे लागते.हे वेगळे सांगणे न लगे! ते काम अर्थातच अड्.काळे यांनी खुबीने केले आहे.हि लढाई त्यांची आयुष्यातील प्रथमच म्हणून कौतुकास पात्र ठरावी इतकेच.
निवडणुका म्हटले की ‘हार’ आणि ‘जित’ या दोन गोष्टी सामोऱ्या ठेवूनच रणांगणात उतरावे लागते.आपल्यावर घाव होतील हि भीती बाळगणारास ‘वीरश्री’ कधीही आपल्या हातून विजयाचा हार घालताना दिसत नाही हे हि तितकेच खरे आहे.
उपऱ्या सभासदांना या निवडणुकीचे आणि त्यातील ‘स्वाभिमान’ आणि ‘अस्मिता’ ‘फायदा’, ‘तोटा’ यांचे काही देणे घेणे नसते.त्यांना केवळ महिन्याला काही किलो फुकटची साखर आणि तोंडावर काही सोयीसवलती फेकून मारल्या तरी पुरेशा ठरतात.त्यातून किमान एक निवडणुकीपुरते तरी सत्ताधाऱ्यांशी बांधिलकी ठेऊन आपले इमान त्यांच्या पायी वाहतात.त्यातून या सहकार सम्राटांची निवडणुकीची नौका सहज तरुण जाते.त्यामुळे या निवडणुकीआधी वाढवलेले ०२ हजार मते वगळली तर काय चित्र समोर येईल हे डोळ्यासमोर आणा म्हणजे हा रणसंग्राम शेतकरी संघटनेच्या व सभासदांच्या दृष्टीने किती मोलाचा होता हे सहज लक्षात येईल.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की,”भारतीय राजकारणात व्यक्तीपूजा अगर भक्तीचा एवढा प्रभाव आहे की,इतर कोणत्याही देशातल्या राजकारणात अशी भक्ती व व्यक्ती पूजा आढळणार नाही.धर्मात भक्तिमार्ग हा मुक्तीमार्ग बनू शकतो परंतु राजकारणात भक्तिमार्ग हा अध:पतनाचा आणि पर्यायाने हुकूमशाहीचा निश्चित मार्ग बनायला वेळ लागणार नाही” वर्तमानात पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात याचा अनुभव ऊस उत्पादक नक्कीच घेत आहे.त्याला श्रीरामपूर तालुका अपवाद नाही.या साखर कारखानदारीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खाजगी कारखानदारिला ‘नाक खाजवून’ आणि ‘वाकुल्या’ दाखवून मालक बनविण्याचे स्वप्न दाखवले होते.प्रत्यक्षात त्यांना गुलाम बनवले आहे.हे आता सत्तर वर्षातील वाटचालीत दिसून आले आहे.आता हे काटेरी झुडुपे वटवृक्षात रूपांतरित झाले आहे.त्यामुळे त्यास उपटून टाकणे एवढे सोपे राहिले नाही हेही तितकेच खरे आहे! मात्र म्हणून त्या पासून कोणाही सुज्ञास दूर जाता येणार नाही.
शिवाजी महाराजांकडे जसे दोन प्रकारचे घोडेस्वार असायचे एक ‘बारगिर’ तर दुसरा ‘शिलेदार’ ज्या घोडेस्वारांना घोडा चालविण्याचे प्रशिक्षण जीन-सामान,आणि हत्यार सर्व काही सरकारातून दिले जायचे त्यांना ‘बारगिर’ म्हणत.तर ज्यांच्याकडे स्वतःचा घोडा आहे.ज्यांनी स्वतःचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.आणि जे स्वतःच्या खर्चाने त्याचे शस्र,घोडा,जीन,सामान,बाळगतात ते स्वयंपूर्ण असे हे घोडेस्वार म्हणजेच ‘शिलेदार’असे.या प्रकारचे ‘बारगिर’ आणि ‘शिलेदार’ या सहकार व साखर सम्राटांनी आपल्या ताब्यात सत्ता आल्यावर तयार केले आहे.व लढाईच्या वेळी त्यांना बाहेर काढून त्यांच्यावर हि जबाबदारी सोपवली जाते.अर्थातच हे ‘बारगिर’ आता ठेकेदार,आणि संचालक असून त्यांना विविध कामांचे ठेके देऊन उपकृत केले जाते व या कामांवर जुंपले जाते हे वेगळे सांगणे गरजेचे नाही.अशा वेळी हे ‘बारगिर’ पाच वर्षातून त्यांना एकदा जुंपले जाते व लढाई जिंकली जाते.आता लढाई म्हणजे निवडणुकीचा आधीच अंदाज घेऊन आपल्या पासून कोण दूर गेले कोण जवळ आहे आहे याची ‘गोळाबेरीज’ व त्यातून आगामी लढाईत आपल्याला किती मतदान वाढवावे लागेल याचे ठोकताळे मांडले जातात.व त्या गणितातून आगामी निवडणुकीचे चित्र उभे केले जाते.या गणिती सूत्राने आता सहकारात मागील सभासदांनी कितीही विरोध केला तरी त्याची गोळाबेरीज विजयात रूपांतर करणे दुरापास्त होते.याचाच दाहक अनुभव वर्तमानात श्रीरामपुरातील अशोकचे सभासद घेत असतील.
“मोफतचा मोह भल्याभल्यांना ‘धृतराष्ट्र’ करून टाकतो.तेथे सामान्यांची काय कथा.याचीच पुनारावृत्ती श्रीरामपूर येथे अशोकच्या निवडणुकीत झाली.ज्यांनी कोणी या सहकार सम्राटांना आपल्या घरात थाळा वाजवून घरात घातले आहे त्याची किंमत त्यांना आगामी पाच वर्ष तरी चुकवावी लागेल त्याला आता तरी पर्याय नाही.”तुम्ही,आम्हाला आता खुशाल लुटा” असे म्हटल्या सारखेच आहे.ऊस दर आणि त्यातील वास्तव शेतकरी संघटनेने मांडूनही त्यांच्या पदरी अपयश आले आहे.वास्तविक ते त्यांच्या पदरी नाही तर ते सत्ताधाऱ्यांना मत देणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी आले आहे”
विशेष म्हणजे या नवख्या उपऱ्या सभासदांना या निवडणुकीचे आणि त्यातील ‘स्वाभिमान’ आणि ‘अस्मिता’ ‘फायदा’, ‘तोटा’ यांचे काही देणे घेणे नसते.त्यांना केवळ महिन्याला काही किलो फुकटची साखर आणि तोंडावर काही सोयीसवलती फेकून मारल्या तरी पुरेशा ठरतात.त्यातून किमान एक निवडणुकीपुरते तरी सत्ताधाऱ्यांशी बांधिलकी ठेऊन आपले इमान त्यांच्या पायी वाहतात.त्यातून या सहकार सम्राटांची निवडणुकीची नौका सहज तरुण जाते.त्यामुळे या निवडणुकीआधी वाढवलेले ०२ हजार मते वगळली तर काय चित्र समोर येईल हे डोळ्यासमोर आणा म्हणजे हा रणसंग्राम शेतकरी संघटनेच्या व सभासदांच्या दृष्टीने किती मोलाचा होता हे सहज लक्षात येईल व हि लढाई किती हातघाईची होती हे सहज जाणता येईल.मात्र इकडे निर्माण झालेला विरोध टिकवून ठेवणे विरोधकांना नाकात दम आणणारी बाब ठरत असते.त्यामुळे सत्ताधारी वर्तुळाचे चक्रव्यूह भेदने तसे दुरापास्तच म्हणावे लागेल.या दृष्टिकोनातून हि निवडणूक पाहिली म्हणजे शेतकरी संघटनेने दिलेली लढाई किती महत्वपूर्ण होती.हे वाचकांच्या सहज लक्षात येईल.एका इंग्रजी म्हणी प्रमाणे आता मोफत-बिफत काही नसते.त्याची किंमत चुकवावीच लागते.पण हा मोफतचा मोह भल्याभल्यांना ‘धृतराष्ट्र’ करून टाकतो.तेथे सामान्यांची काय कथा.याचीच पुनारावृत्ती श्रीरामपूर येथे अशोकच्या निवडणुकीत झाली.ज्यांनी कोणी या सहकार सम्राटांना मत दिले आहे त्यांनी आपल्या घरात थाळा वाजवून घरात…घातले आहे असे म्हणण्यासारखे आहे. त्याची किंमत त्यांना आगामी पाच वर्ष तरी त्यांना चुकवावी लागेल त्याला आता तरी पर्याय नाही.सभासदांची ही कृती “तुम्ही,आम्हाला आता खुशाल लुटा” असे म्हटल्या सारखेच आहे.ऊस दर,कारखान्याचा प्रचंड तोटा काटेमारी,साखर उताऱ्यातील चोरी आदी वास्तव शेतकरी संघटनेने मांडूनही त्यांच्या पदरी अपयश आले आहे.वास्तविक ते त्यांच्या पदरी नाही तर ते सत्ताधाऱ्यांना मत देणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी आले आहे.
त्यामुळे आगामी काळात या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वाखाली हि निवडणूक लढवली ते शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अड्.अजित काळे,शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिग्रेडचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग रायते,शेतकरी वीजबिल प्रश्नाचे जाणकार माउली वणवे,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक,श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक,निळवंडे कालवा समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,अड्.एस.के.कापसे.अड्.सर्जेराव घोडे,डॉ.वंदना मुरकुटे,ज्ञानेश्वर मुरकुटे,सुरेश ताके,जितेंद्र भोसले,युवराज जगताप,नगर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष अनिल औताडे,गोविंद वाघ,विष्णुपंत खंडांगळे,आदींचे योगदान वाया जाणार नाही.या निवडणुकीत त्यांनी केलेली मशागत त्यांना आगामी काळात श्रीरामपूरच्या भूमीत नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.
वास्तविक हि लढाई तशी कौरव आणि पांडवांची म्हटली पाहिजे.एकीकडे प्रचंड पैसा आणि मनुष्यबळ तर दुसरीकडे त्याची वानवा असतानाही सभासदांनी दिलेली साथ मोलाची ठरल्याने या लढाईत माजी आ.मुरकुटे यांच्या नाकात दम आणला होता.ते आपल्या सुनबाई श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ.वंदना मुरकुटे यांच्या पेक्षा केवळ ३७० मतांनी पुढे होते.याचा अर्थ त्यांची लढाई हि लाल महालातील शाहिस्तेखासारखी केवळ बोटावर निभावली असे म्हटले सर्व वावगे ठरू नये.