कोपरगाव तालुका
रस्त्यांची दुरवस्था वारीचे नागरिक हैराण,तहसीलदारांना निवेदन
December 23, 2019
290 Less than a minute
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरंगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी गावातील सर्व ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी आज नादुरुस्त रस्त्यांना वैतागून अखेर कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना भेटून वारी परिसरातील हे रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
कोपरगाव सह तालुक्यात रस्त्यांसाठी साडेतीनशे कोटी रुपये आणल्यावरून मोठमोठ्याने सत्ताधारी व त्यांच्या समर्थकांनी ढोल बडवले होते.मात्र तालुक्यात काही बोटावर मोजण्याइतकेच रस्ते बरे या व्याख्येत बसणारे आहे.त्याची दाहकता आता पाऊस थांबल्यामुळे नागरिकांना चांगलीच जाणवू लागली आहे.वारी ग्रामपंचायत आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा दैनंदिन व्यवहार हा कोपरगावशी जोडला गेला आहे.शाळा,महाविद्यालये,अन्य महाविद्यालये,उद्योग आदींसाठी वारी कोपरगाव या मार्गावरून नागरिकांची मोठी ये जा होत असते.मात्र वारीला चारही दिशांनी जोडणाऱ्या रस्त्यांची फारच दुरवस्था झाली आहे.या बाबत ग्रामस्थांनी आता बोलण्यास सुरुवात केली आहे.विद्यार्थी आणि पालक ग्रामस्थ यांनी एकत्र येत आवाज उठविण्यास प्रारंभ केला आहे. वारी गाव हे कारखाना असलेले आणि कोपरगाव शिर्डी राहता वैजापूर श्रीरामपूर अशा तालुक्यांना जवळीक असल्याने याठिकाणी अवजड वाहनांसाठी कुठलाही रस्ता योग्य नाही तसेच या रस्त्यामुळे गावातील मुला-मुलींना लग्नासाठी स्थळ मिळत नाही तसेच महिलांना प्रसूतीच्या काळात तालुक्याला जायचे असल्यास त्यांची प्रसूती रस्त्याच्या परिस्थितीने प्रसूती ही गाडीमध्ये होते तर विद्यार्थ्यांना शाळेत महाविद्यालयात आणि नोकरदार वर्गाला या रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे वेळेत कधी पोहोचता येत नाही. मुलांचे आणि विद्यार्थ्यांनीं यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी शासनाने याकडे लक्ष घालून लवकरात लवकर तत्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा गावकरी विद्यार्थी महिला व्यापारी नोकरदार हे सर्व रस्त्यावर उतरतील असा इशारा विद्यार्थी व पालकांनी तहसीलदार चंद्रे यांना दिला आहे.