कोपरगाव तालुका
गंगागिरी महाविद्यालयाच्या शुभम शेजवळला पुणे विद्यापीठाचे सुवर्ण पदक”
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)
पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मार्च-एप्रिल २०१८ मध्ये झालेल्या वाणिज्य विभागाच्या तृतीय वर्षाच्या परीक्षेची विद्यापीठ गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून त्यामध्ये कोपरगाव येथील श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयातील येसगाव येथील विद्यार्थी शुभम रामभाऊ शेजवळ याने सुवर्ण पदक पटकावले आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शुभम शेजवळ त्याचे वडील रामभाऊ शेजवळ लहानशी पानटपरी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. या परिस्थितीमध्ये चि.”शुभम” यास पुणे विद्यापीठाचे सुवर्ण पदक प्राप्त झाल्याचा त्यांना सार्थ अभिमान वाटत आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम.कॉलेजमधील हा गुणी विद्यार्थी प्रत्येक परीक्षेमध्ये अव्वल स्थान प्राप्त करत होता. त्याचे संपूर्ण शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाखांमध्ये झाल्याने त्याच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे , कर्मवीर शंकरराव काळे स. सा. का. गौतमनगरचे जेष्ठ संचालक अशोक काळे , महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन भगिरथ शिंदे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना सहजानंदनगरचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, आमदार आशुतोष काळे,सुनील गंगुले, दिलीप दारुणकर,संदीप वर्पे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे, उपप्राचार्य डॉ.विजय निकम, प्रा.रमेश झरेकर, डॉ.रामदास पवार, प्रा.डी.डी.सोनवणे, क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अजय गर्जे, डॉ.अतीश काळे, डॉ.राजाराम कानडे, डॉ.गणेश विधाते, प्रा.अरुण देशमुख, श्री.वसंत पवार व सर्व रयत सेवक मित्र,आदीनी त्याचे अभिनंदन केले आहे. शुभम सध्या एम.कॉम वर्गात शिक्षण घेत आहे. त्याचे सी.ए. होण्याचे स्वप्न आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.