जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा आलेख उतरला

जाहिरात-9423439946
न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात घसरत असंताना दिसत आहे.सरकारने आता विविध उपाय योजना करून लसी देण्याचे प्रमाण वाढवले आहे.मात्र कोपरगाव,संगमनेर,राहाता तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.त्यामुळे प्रशासनाची डोकेदुःखी वाढली आहे. कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५७१ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०५ रुग्ण बाधित आढळले असून ५६६ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ५८० स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०० तर अँटीजन तपासणीत ०५ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०६ असे एकूण अहवालात किरोकोळ वाढ येऊन केवळ ११ रुग्ण बाधित आढळले आहे.तर २६ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १४ हजार ५९३ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १०२ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २२१ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५१ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०२ लाख ०३ हजार ३९२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०८ लाख १३ हजार ५६८ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०७.१७ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १४ हजार २७० रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.७९ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख ३४ हजार ३५९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार ४४३ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०३ लाख २३ हजार ९८६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ९२९ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.पुढाऱ्यांचे वाढदिवस,यात्रा,लग्न,दहावे,वर्षश्राद्ध,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि नगर जिल्ह्यात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.
   त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.राहाता तालुक्यात आता दुकाने सकाळी आठ ते दुपारी चार वाजे पर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास आदेश दिले आहे.व आठवडे बाजार प्रारंभ केला आहे.जिल्ह्यात जवळपास एकसष्ठ गावे प्रतिबंधित केले आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील गोधेगावचा समावेश असून या तालुक्याचा आलेख अलीकडील काळात चिंताजनक वाढुन तो आता मंदावला आहे.त्यामुळे प्रशासनने आता कोरोना लसीचा वेग विलक्षण वाढवला आहे.त्यामुळे ग्रामीण भागासह आता शहरी भागातही रुग्णसंख्या रोडावण्यास मदत होत आहे.त्यामुळे नागरिकांत पुन्हा समाधानाचे वातावरण पसरण्यास सुरुवात झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close