जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946

कोपरगाव तालुक्यात ६३ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी संपन्न

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

राज्यात या वर्षी चांगले पर्जन्यमान झाले आहे.त्यामुळे रब्बी पिकांच्या पेरणीला गती येऊन ती अंतिम टप्पात आली असून कोपरगाव तालुक्यात साप्ताहिक अहवालानुसार कोपरगाव तालुका कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार २१ हजार ९६० हेक्टर पैकी ७ हजार ०३० हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली असून हि आकडेवारी ६३ टक्के इतकी आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

नगर जिल्ह्यात गतवर्षी पर्जन्यच नव्हता त्यामुळे रब्बी पेराणीवर प्रतिकूल परिणाम झाला होता.या वर्षी परतीच्या पावसाने बराच काळ म्हणजे ऑक्टोबर अखेर ठाण मांडल्याने खरिपाचे नुकसान झाले आहे हे खरे असले तरी रब्बी पिकांबाबत मात्र आशा अपेक्षा दुणावल्या आहे.नगर जिल्ह्यात रब्बीखाली साधारण ६ लाख ६७ हजार २६१ हे.क्षेत्र रब्बीखाली मोडले जाते.रब्बीत महत्वाचे पीक म्हणून ज्वारीस स्थान आहे.ज्वारीचे जिल्ह्यात ४ लाख ६९ हजार ७८५ हेक्टर क्षेत्र आहे.कोपरगाव तालुक्यात ज्वारी,गहू,मका, इतर रब्बी तृणधान्य असे मिळून २ डिसेंबर अखेर १३ हजार ६८० हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार ६५४ इतक्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे.त्याची टक्केवारी ३४ टक्के इतकी आहे.तर रब्बी अन्नधान्य म्हणून हरभरा, इतर रब्बी कडधान्य मिळून २१ हजार ९६० हेक्टर क्षेत्रापैकी ७ हजार ०३० हेक्टरवर (६३ टक्के) पेरण्या झाल्या आहेत.या खेरीज करडई,तीळ,जवस,सूर्यफूल व इतर रब्बी गळीत धान्य मिळून पेरणी होत असते मात्र अद्याप या पातळीवर शांतता आहे.अशी माहितीही तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी शेवटी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close