जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राष्ट्रवादीच्या वतीने संविधान दिनानिमित्त डॉ.आंबेडकरांना अभिवादन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने संविधान दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

15ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस “भारतीय संविधान दिन” म्हणून साजरा केला जातोभारतीय संविधानात अनेक पाश्चात्त्य देशांच्या उदारमतवादी राज्यघटनांचा व ब्रिटिश वसाहतवादी संविधानाच्या पायाभूत तत्त्वांशी मेळ घालण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन् भारताच्या व्हॉईसरायकडे असलेले प्रमुख पद नव्या व्यवस्थेत राष्ट्रपतीकडे सोपवण्यात आले व व्हाईसरॉयचे प्रशासकीय अधिकार पंतप्रधानांकडे देण्यात आले आहेत. राज्यघटनेच्या ७४व्या कलमानुसार राष्ट्रपतींचेचे अधिकार मर्यादित असून ते केवळ मंत्रिमंडळास सल्ला देऊ शकतात. राष्ट्रपती हे तीनही सैन्यदलांचे प्रमुख असतात. ब्रिटिश व्यवसप्रमाणेभारतीय संसदही द्विगृही आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, संदीप पगारे, मंदार पहाडे, सुनील शिलेदार, राजेंद्र वाघचौरे, हिरामण गंगुले, अजीज शेख, मेहमूद सय्यद, फकीर कुरेशी, दिनकर खरे, अशोक खांबेकर, रावसाहेब साठे, संतोष डागा, संतोष देवळालीकर, राहुल देवळालीकर, अंबादास वडांगळे, वाल्मिक लहिरे, नितीन त्रिभुवन, विजय त्रिभुवन, मनोज शिंदे, अरविंद विघे, इम्तियाज अत्तार, राजेंद्र उशिरे, मनोज शिंदे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close