कोपरगाव तालुका
कर्मवीर काळे कारखान्याचा उद्या गळीत हंगाम शुभारंभ
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन २०१९-२० या वर्षाच्या ६५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार दि.28 नोव्हेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे जेष्ठ संचालक,तथा माजी आ. अशोक काळे व त्यांच्या धर्मपत्नी पुष्पाताई काळे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप व उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी जनशक्ती न्यूजला दिली आहे.
या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमास सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासद व उद्योग समुहावर प्रेम करणारे हितचिंतक व कार्यकर्त्यांनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ व व्यवस्थापनाने शेवटी केले आहे.