खेळजगत
कु.वृषाली नरोडेची ४८ कि. ग्रॅम वजनात कास्यपदकाची कमाई
संपादक -नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
बारामती या ठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय कराटे स्पर्धेत १९ वर्षें वयोगटात कोपरगाव येथील श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. नरोडे वृषाली गोरक्षनाथ हिने ४८ कि.ग्रॅ.वजन गटात लक्षवेधी खेळाचे प्रदर्शन करून कास्यपदक मिळवले आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. थोपटे, उपप्राचार्य. डी. डी. सोनावणे, महाविद्यालयाचे अधिक्षक व्ही. एस. पवार, मुख्य लिपिक एस. के. पवार महाविद्यालय विकास समिती सदस्य, तसेच महाविद्यालयाचे शिक्षक , माजी खेळाडु व विद्यार्थी यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विशाल पवार, प्रा. शिवप्रसाद जंगम, प्रा. आकाश लकारे यांनी यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन केले होते.