नगर जिल्हा
शिर्डी बाह्यवळण रस्त्याची लागली वाट,अवजड वाहनांचे प्रचंड नुकसान
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
शिर्डी या तिर्थस्थळाची शहरातील गर्दी कमी करण्यासाठी कोऱ्हाळे मार्गे बनविण्यात आलेला बाह्य वळण रस्ता दुसऱ्यांदा दुरुस्त करुणही या रस्त्याचे पुन्हा एकदा पहिले पाढे पंचावन्न म्हणण्याची नामुष्की सार्वजनिक बांधकाम विभागावर ओढवली असून या रस्त्याची अल्पावधीतच वाट लागल्याने अवजड वाहनांच्या जीवित हानी बरोबरच प्रचंड नुकसान होत आहे.मात्र दाद नेमकी कोणाकडे मागायची हा प्रश्न त्यांच्यापुढे “आ”वासून उभा असल्याने त्यांना तोंड दाबून बुक्यांचा मार खाण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.
अनेक साडेसातीचे फेरे सफल संपूर्ण झाल्यावर या रस्त्याला गती आली मात्र कामाची गुणवत्ता मात्र कधीही आढळली नाही.रस्त्यांचे काम गत पावसाळ्या आधी संपले असतानाच पावसाळा संपे पर्यंत रस्त्याची वाट लागली होती.सार्वजनिक बांधकाम विभागाने केलवड पासून उत्तरेकडील निघोज पर्यंत रस्त्याची पुन्हा निविदा काढली होती.व ते काम गत वर्षी पूर्ण केले असताना एक पावसाळा उलटत नाही तोच पुन्हा या पावसाळ्यात या रस्स्त्याची वाट लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वर्तमानात या रस्त्यावर रस्ता कमी व खड्डे जास्त अशी दुर्दैवी परिस्थिती ओढवली आहे.त्यामुळे रस्त्यावरील सर्व व्यावसायिकांचे धंदे,धोक्यात आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,नगर-मनमाड मार्गावर शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र येते .या ठिकाणी शिर्डीत गुरुवार,शनिवार,व रविवार या खेरीज सण, उत्सव काळात साई समाधीच्या दर्शनाला साई भक्तांची प्रचंड गर्दी असते.म्हणून तत्कालीन सरकारने शिर्डीसाठी बाह्यवळण रस्ता प्रस्तावित केला होता.त्यासाठी भूसंपादन व रस्त्याचा खर्च साई संस्थान करणार होते.मात्र या रस्त्याच्या भूसंपदानालाच जवळपास पंधरा वर्ष खर्ची पडले एवढेच नव्हे तर भूसंपादन करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमून त्यांचे पगार साई संस्थानच्या तिजोरीतून करण्यात आले होते.तरीही लवकर एक आर.जमीन या अधिकाऱ्यांकडून भूसंपादन झाली नव्हती मात्र कहर म्हणजे त्यांनी पुन्हा पगार वाढीचा तगादा साई संस्थानकडे लावला होता.मात्र आमच्या प्रतिनिधीने संस्थानच्या बैठकीच्या दिवशीच त्यांचा भंडाफोड केल्याने या अधिकाऱ्यांना व त्यांच्या समर्थक नेत्यांना शेपूट गुंडाळून हि पगारवाढ थांबवावी लागली होती.त्यानंतर या रस्त्याला गती आली मात्र कामाची गुणवत्ता मात्र कधीही आढळली नाही.रस्त्यांचे काम गत पावसाळ्या आधी संपले असतानाच पावसाळा संपे पर्यंत रस्त्याची वाट लागली होती.सार्वजनिक बांधकाम विभागाने केलवड पासून उत्तरेकडील निघोज पर्यंत रस्त्याची पुन्हा निविदा काढली होती.व ते काम गत वर्षी पूर्ण केले असताना एक पावसाळा उलटत नाही तोच पुन्हा या पावसाळ्यात या रस्स्त्याची वाट लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वर्तमानात या रस्त्यावर रस्ता कमी व खड्डे जास्त अशी दुर्दैवी परिस्थिती ओढवली आहे.त्यामुळे रस्त्यावरील सर्व व्यावसायिकांचे धंदे,धोक्यात आले आहे.केलवड ते पिंप्री निर्मळ या रस्त्यावर दुचाकी चालविणे अवघड बनले आहे.तर अन्य अवजड वाहनाचे तर विचारण्याची सोय नाही इतकी वाईट परिस्थिती आहे.या मार्गावर तर अवजड वाहने दर दिवसाला उलटत असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.याकडे लक्ष द्यायला राजकीय नेत्याना लक्ष नाही त्याना आपल्या खुर्चीचे पडले आहे.मात्र इकडे अनेकांचे जीविताचे व वित्तीय मालमत्तेचे प्रचंड नुकसान होत आहे.या रस्त्याचे काम त्वरित केले नाही तर आपण सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध आंदोलन करू असा इशारा कोऱ्हाळे,डोऱ्हाळे,केलवड,पिंप्री निर्मळ,काकडी,वाळकी,निघोज,आडगाव,खडकेवाके आदी गावातील ग्रामस्थानी दिला आहे.