नगर जिल्हा
अशोक कारखान्यावर सहकार सप्ताहास उत्साहात प्रारंभ
संपादक-नानासाहेब जवरे
श्रीरामपूर (प्रतिनिधी)
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक सहकारी साखर कारखाना येथे सहकार सप्ताहाचा शुभारंभ अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ यांचे हस्ते ध्वजारोहन करुन मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे. यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन करण्यात आले.
राज्याच्या विकासातील सहकार क्षेत्राचे योगदान नागरिकांना माहीत व्हावे, यासाठी यंदा सहकार विभागाच्यावतीने १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान, राज्य आणि जिल्हास्तरावर सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत विकासामध्ये सहकाराचे योगदान’ या संकल्पनेवर हा सप्ताह असणार आहे. सप्ताहाच्या नियोजनासाठी सहकार आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांच्या सूचनेनुसार राज्यभर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सहकार सप्ताह अधिक व्यापक करण्याच्यादृष्टीने राज्य आणि जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या सप्ताहाममध्ये राज्यस्तरावर राबविण्यात येणारे कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये राबवले जात आहे.
सहकार विभागाच्या वतीने दर वर्षी सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यंदा या सप्ताहाची व्याप्ती वाढण्यात आली आहे. या सप्ताहात सहकार विभागाशी निगडित वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामध्ये नागरी बँका, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, पणन सहकारी संस्था, सहकारी साखर कारखाने, मजूर सहकारी संस्था, औद्योगिक सहकारी संस्था, सहकारी सूतगिरण्या, हातमाग व यंत्रमाग संस्था, दुग्ध व मत्स्यव्यवसाय संस्था आदी विषयांवर ऊहापोह केला जाणार आहे.’या कार्यक्रआंतर्गत अशोक साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सहकार सप्ताह निमित्त अध्यक्ष श्री.कहांडळ यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सुरक्षा विभागाच्या वतीने मानवंदना दिली. या सहकार सप्ताह निमित्ताने दि.20 नोव्हेंबर पर्यंत विविध उपक्रम राबविले जाणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी अशोक कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे, व्यवस्थापक संभाजी झाडे, कार्यालय अधिक्षक आप्पासाहेब दुशिंग, बाळासाहेब उंडे, आण्णासाहेब वाकडे, प्रमोद बिडगर, बाळासाहेब दोंड, प्रकाश पवार, नानासाहेब लेलकर, भाऊसाहेब दोंड, अनिल कोकणे, ज्ञानेश्वर बडाख, राजेंद्र बनकर, रमेश आढाव, विष्णुपंत लवांडे, कृष्णकांत सोनटक्के, विलास लबडे, दत्तात्रय धोंडगे, अशोक राऊत यांचेसह अधिकारी व कामगार उपस्थित होते.