कोपरगाव तालुका
कोपरगावातून अश्वमेध तर्फे पुरग्रस्तांना औषधांची मदत
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील प्रसिद्ध किडरोग तज्ज्ञ व कृषी शास्रज्ञ डाॅ.ज्ञानेश्वर वाघचौरे हे संचालक असलेल्या अश्वमेध मेडिकेअर या कंपनीच्या वतीने राज्यातील पूरग्रस्तांना पाच लाख पंचवीस हजारांच्या औषधांची मदत नुकतीच रवाना केली असून त्याला गाडीला आ.आशुतोष काळे हिरवा झेंडा दाखवला आहे.अश्वमेधच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“राज्यात पुरापाठोपाठ आता साथीचे रोग तेथे बळावत आहे ही माहिती तेथील स्थानिक लोकांकडून आणि प्रसार माध्यामांकडुन कळल्यानंतर माणुसकीच्या नात्याने कोपरगाव येथील अश्वमेध मेडिकेअर यांच्याकडून कोविड पेटंट असलेल्या व लाखो रुग्णांना वरदान ठरलेल्या कफेक्स व प्रोटेक्ट या औषधांचा मदत ज्ञेयच्या आली आहे”-डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे,संचालक अश्वमेध मेडिकेअर.
राज्यात अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा यात समावेश आहे. त्यात कोल्हापुरातली परिस्थिती गेल्या दोन दिवसांत अधिक गंभीर झाली आहे. पण हा प्रलयकारी पाऊस म्हणजे केवळ निसर्गाचा प्रकोप आहे की आपल्या चुकांचे दुष्परिणाम यावर चर्चा होणं गरजेचं आहे.हे करतांना राज्यातील आपत्तीत सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याची गरज आहे.शासन त्यांच्या पातळीवर हि मदत आहेच पण यात नागरिकांच्या सहकार्याची अपॆक्षा आहे.नेमकी हि गरज ओळखून कोपरगावातील अश्वमेध मेडिकेअर कंपनीचे संचालक डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी हि आरोग्याच्या माध्यमातून हि मदत करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा शुभारंभ आज आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून केला आहे.
राज्यात पुरपरिस्थीतीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लोकांचे अन्न वस्ञ निवारा या मुलभुत गरजांचे पुर्ण नुकसान झालेले आहे पुरापाठोपाठ आता साथीचे रोग तेथे बळावत आहे ही माहिती तेथील स्थानिक लोकांकडून आणि प्रसार माध्यामांकडुन कळल्यानंतर माणुसकीच्या नात्याने कोपरगाव येथील अश्वमेध मेडिकेअर यांच्याकडून कोविड पेटंट असलेल्या व लाखो रुग्णांना वरदान ठरलेल्या कफेक्स व प्रोटेक्ट या औषधांचा मदत आ.आशुतोष काळे यांचे शुभहस्ते झेंडा दाखवून रवाना करण्यात आली आहे. ही औषधे रायगड,कोल्हापुर,सांगली,सातारा, व रत्नागिरी या जिल्हा साठी पाठवण्यात आली आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.