नगर जिल्हा
शिर्डीत मनशांती व्याख्यानमालेचे संस्थानच्या वतीने 19 नोव्हेंबर पासून आयोजन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था व लोणावळा येथील मयुर चंदने, जीवनदान साधक, मनशक्ती प्रयोग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक १९ नोव्हेंबर ते शुक्रवार दि. २२ नोव्हेंबर या कालावधीत साईआश्रम शताब्दी मंडप येथे मनशक्ती व्याख्यानमाला (यशाचे विज्ञान सांगणारे सत्र) संस्थानचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
साईबाबा संस्थान मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सुमारे एक ते दिड तासांचे एक सत्र,”तणावमुक्त यशाचे विज्ञान” या विषययांवर व्याख्यानमाला (यशाचे विज्ञान सांगणारे सत्र) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचा लाभ सर्व कर्मचा-यांना घेता यावा यासाठी दिवसामध्ये सुमारे एक ते दिड तासांच्या चार सत्रांमध्ये सर्व कर्मचा-यांना आलटून पलटून या कार्यक्रमात सहभाग घेता येणार आहे.
मुगळीकर या वेळी पुढे बोलताना म्हणाले कि, लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्राचे जीवनदान साधक मयुर चंदने यांच्या मार्फत श्री साईबाबा संस्थान मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सुमारे एक ते दिड तासांचे एक सत्र ताणमुक्त यशाचे विज्ञान या विषययांवर व्याख्यानमाला (यशाचे विज्ञान सांगणारे सत्र) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचा लाभ सर्व कर्मचा–यांना घेता यावा यासाठी दिवसामध्ये सुमारे एक ते दिड तासांच्या चार सत्रांमध्ये सर्व कर्मचा-यांना आलटून पलटून या कार्यक्रमात सहभाग घेता येणार आहे. याबरोबरच शैक्षणिक संकुलाचे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांकरीता मेंदु शास्त्र व शिक्षणशास्त्रावर आधारीत विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच इ.८ वी ते १२ वी व कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ताणमुक्त अभ्यास व यश या विषयावर उपक्रम घेण्यात येणार आहे.
मनशक्ती व्याख्यानमाला हा कार्यक्रम साईआश्रम शताब्दी मंडप (साई आश्रम १) येथे दिनांक १९ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत दररोज सुमारे एक ते दिड तासांच्या चार सत्रांमध्ये होणार असून या कार्यक्रमाचा संस्थानचे सर्व अधिकारी, कर्मचारी, अध्यापक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही मुगळीकर यांनी शेवटी केले आहे.