निधन वार्ता
साई संस्थानचे माजी विश्वस्त डॉ.गर्जे यांना मातृशोक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ व श्री.साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त डॉ.अजेय गर्जे यांचे मातोश्री माणिकताई चंद्रकांत पाटील गर्जे (वय ८९) यांचे नुकतेच कोपरगाव निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.माणिकताई या पाथर्डी पंचायत समिती सदस्य,सभापती,जिल्हा परिषद सदस्य या निवडणुका काँग्रेस पक्षाबरोबर लढविल्या आणि जिंकल्या.सन १९७२ साली वसंतराव नाईक यांचे आग्रहाखातर विधानसभा निवडणुक लढविली.त्यात अतिशय अल्प मताने त्यांचा पराभव झाला.पुरुषांइतकेच स्रीयांनी समाजकारणासोबत,राजकारण विविध क्षेत्रातही पुढे यावे.अशी त्यांची भावना शेवटपर्यंत होती.
स्वतंत्र विचार आणि महिलांच्या स्वावलंबनासाठी झटणाऱ्या स्व.माणिकाताई गर्जे यांचे कोपरगाव येथे निधन झाले आहे.त्यांचे वृद्धापकाळात छोटा अपघातात त्यांचेवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन दिवसांनी प्राणज्योत मालवली.चुल आणि मुल या विचारात जखडलेल्या ५० दशकांपूर्वीच्या कालखंडात पाथर्डी ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला सरपंच झाल्या.त्याचे पती पाथर्डी येथील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व,काॅग्रेसचे नेते चंद्रकांत पाटील गर्जे यांचे नावाचा विशेष दबदबा होता.स्व.माणिकताई यांची संघटनात्मक आणि दूरदृष्टी कार्याला पतीने दिलेली साथ मोलाची ठरत गेली.पुढे त्या पंचायत समिती सदस्य,सभापती,जिल्हा परिषद सदस्य या निवडणुका काँग्रेस पक्षाबरोबर लढविल्या आणि जिंकल्या.सन १९७२ साली वसंतराव नाईक यांचे आग्रहाखातर विधानसभा निवडणुक लढविली.त्यात अतिशय अल्प मताने त्यांचा पराभव झाला.पुरुषांइतकेच स्रीयांनी समाजकारणासोबत,राजकारण विविध क्षेत्रातही पुढे यावे.अशी त्यांची भावना शेवटपर्यंत राहिली.
कोपरगाव नगरपरिषदेचे सलग दहा वर्षे नगरसेवक राहिलेले डॉ.अजेय गर्जे यांनी आईच्या सामाजिक कार्याला पुढे नेण्यासाठी त्यांचे हयातीत श्रीमती माणिकताई चंद्रकांत पाटील गर्जे चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करुन माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.त्यात महामानव बाबा आमटे यांच्या आनंदवनला मोठी औषधे दिली.तसेच वैद्यकीय सेवा शिबीराचे आयोजन केले आहे.तसेच कोपरगाव शहरातील साईनगर येथे स्थायिकांच्या लोकसहभागातून होत असलेल्या उद्यानाला मोठी मदत मिळवून दिली.त्यामुळे स्थानिक रहिवासी यांनी या उद्यानाला “मातोश्री माणिकताई चंद्रकांत पाटील गर्जे उद्यान “असे नामकरण करण्यात माणिकताई यांना हयातीत अनोखी भेट दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले होते.
त्यांचे पच्छात मोहटादेवी देवस्थानचे विश्वस्त उदयन गर्जे श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त व बालरोग तज्ञ डॉ.अजेय गर्जे दोन मुले तर अंजलीताई आंधळे(पणजी-गोवा), उज्वला गिते(भोपाळ),अभया काळुशे (औरंगाबाद) तीन विवाहित मुली,सुना,जावई,नातू,पणतू असा मोठा गर्जे परिवार आहे.
गर्जे बाल रुग्णालयाचे संचालक नकुल गर्जे,वैद्यकीय अधिकारी डॉ.वरद अजेय गर्जे यांच्या त्या आजी होत्या.
त्यांचे निधनाची वार्ता समजताच माणिकताई गर्जे यांचे निधनाची वार्ता समजताच आ.आशुतोष काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,हृदय रोग तज्ञ डॉ.डी.एस.मुळे,आयुर्वेदाचार्य डॉ.रामदास आव्हाड,डॉ.संदिप मुरुमकर,डॉ.रमेश सोनवणे,शुक्राचार्य देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,औद्योगिक वसाहतीचे संचालक डॉ.चंद्रशेखर आव्हाड,स्वच्छतादूत सुशांत घोडके,होमिओपॅथी तज्ञ डॉ.संतोष आव्हाड,निलेश कोठारी डॉ.बंडू शिंदे, डॉ.योगेश बनकर यांचे सह अनेकांनीं तीव्र दुःख व्यक्त केले आहे.