जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांचा वाढदिवस कोपरगाव शहरात वृक्षारोपण करून व महीलांना अगरबत्ती प्रशिक्षण देवून साजरा करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राज्यभर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविली जात आहे. या योजनेमधून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाणार आहे. पर्यावरणातील होत असलेले बदल त्याचा शेती व शेती उद्योगावर होत असलेले वाईट परिणाम कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीचा उपयोग करून घेता येणार आहे.यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन या गोष्टीविषयी जनजागृती होणे आवश्‍यक आहे.

बचत गटाच्या शिक्षित आणि अल्पशिक्षित महिलांना लघू व गृहउद्योगाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना विविध लघु उद्योगाचे प्रशिक्षण देवून तसेच व्यवसायासाठी विविध बँकाच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवून दिले जात आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात बचतगटांच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक स्तर उंचावला जाऊन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण घडून येत आहे. हि परंपरा यापुढेदेखील सुरु राहावी यासाठी मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव येथे बचत गटाच्या महीलांना अगरबत्ती प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून कुटुंबाची विस्कटलेली आर्थिक घडी बसण्यास मोठी मदत झाली असल्याचे सांगितले. तसेच यावेळी निसर्गाचा समतोल राखला जावा यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासून वृक्षारोपण देखील करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा स्वप्नजा वाबळे,नगरसेविका श्रीमती वर्षा गंगुले,माधवी वाकचौरे, मायादेवी खरे,मनीषा विसपुते,संगीता विसपुते, सुनेत्रा कुलकर्णी,सीमा पानगव्हाणे,रश्मीताई कडू,सुनिता खैरनार,शारदा शिंदे,पूजा आहेर,चैताली सूर्यवंशी,मीना अडांगळे,सोनाली शिंदे,रुपाली शिंदे,नेहाबाई गवई, रेणुका बाभूळके,निर्मला शिंदे,कलावती शिंदे,शोभा अडांगळे,सुशीला निकम,कोकिळा हिवरडे आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close