जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शेतकरी संघटनेचे सभासद व्हा-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शेतकरी संघटनेने सभासद नोंदणी अभियान सुरु केलेले आहे.आपण सर्व जनता आता संघटित झाल्याशिवाय आपल्या न्याय हक्कासाठी, तसेच शेतमालाला योग्य भाव मिळणेसाठी,तसेच विज,पाणी,खत,शेत विम्याचा प्रश्न,असे एक ना अनेक प्रश्न आपल्या पुढे निर्माण होत आहेत ते जर ताकदीने सोडवायचे असतील तर शेतकरी संघटना मजबूत केल्याशिवाय ते शक्य होणार नाही त्यामुळे सुज्ञ शेतकऱ्यांनी या संघटनेचे सदस्य व्हावे असे आवाहन युवा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

“शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील,कार्याध्यक्ष कालिदास आपेट,युवा प्रदेशाध्यक्ष ॲड.अजित काळे,नाना नांदखेले व इतर अनेक कार्यकर्ते हे प्रामाणिक पणे संघटनेचे काम करत आहेच,परंतु यात सुसूत्रता आणण्यासाठी व शेतकरी संघटनेचे शकले करून पोट भरणाऱ्या लोकांना चाप बसण्यासाठी तसेच शेतकरी समस्यांना स्वार्थी राजकीय पुढाऱ्यांच्या हातचं बहुल होण्यापासून वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी होणं गरजेचं आहे”-अड्.अजित काळे,प्रदेशाध्यक्ष,शेतकरी युवा आघाडी.

शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे.अनेकांनी मूळ उद्देश बाजूला ठेऊन आपला पोटभरू धंदा केला आहे.लोकशाहीत आता विचाराच्या बरोबरच संख्येला सुदधा महत्व प्राप्त झाले आहे.व हाच हा धागा पकडून शेतकरी संघटनेने सभासद नोंदणीला सुरवात केली आहे.वरील प्रश्न हे सार्वजनिक वाटत असले तरी ते वैयक्तिकच आहेत.आपल्या शेतकरी कुटुंबाचे आहेत.आपण सगळे जाणताच कि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील,कार्याध्यक्ष कालिदास आपेट,युवा प्रदेशाध्यक्ष ॲड.अजित काळे,नाना नांदखेले व इतर अनेक कार्यकर्ते हे प्रामाणिक पणे संघटनेचे काम करत आहेच,परंतु या मध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व शेतकरी संघटनेचे शकले करून पोट भरणाऱ्या लोकांना चाप बसण्यासाठी तसेच शेतकरी समस्यांना स्वार्थी राजकीय पुढाऱ्यांच्या हातचं बहुल होण्यापासून वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी होणं गरजेचं आहे.त्यामुळे सदरील अभियान हाती घेण्यातआले आहे.त्यामुळं शेतकरी हिताची अंमलबजावणी योग्य मार्गने होण्यास मदत मिळेल.आज संघटनांच खुप पीक आले आहे, व त्यामुळे विचाराला धार राहिली नाही.कोणताही दूरगामी विचार न करता आंदोलने केली जातात व त्यात नंतर तडजोड केली जाते व त्याचा फटका हा सर्वसामान्य शेतकऱ्याला बसतो.त्यामुळे विचार करा आपल्याला आपल्या भावी पिढीला सम्मानमाने जगण्यासाठी एक चांगली व्यवस्था निर्माण करून द्यावयाची असेल तर आताच सावध व्हा.आपण कोणत्याही राजकीय विचाराचे असले तरी प्रथम आपण शेतकरी आहोत हे लक्षात ठेवावे बाकी व आपण संघटनेचे सभासद होऊन संघटनेला ताकद द्यावी असे आवाहनही ॲड.अजित बी.काळे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close