दळणवळण
कोपरगाव तालुक्यातील रस्त्यासाठी सात कोटींचा निधी मंजूर-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या दळणवळणाची महत्वाचा ठरणारा व सांगवी भुसार,सोनारी,मळेगाव थडी,गावातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या धारणगाव,सोनारी,चास,बक्तरपूर,वडगाव या (प्राजिमा -८) रस्त्याच्या नुतनीकरणासाठी ७ कोटी रुपये खर्चास मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये नुकतीच दिली आहे.
सांगवी भुसार,सोनारी,मळेगाव थडी,धारणगाव,सोनारी,चास,बक्तरपूर,वडगाव या गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.त्या बाबत वरील गावातील नागरिकांनी या रस्त्याची दुरुस्ती करणेबाबत आ.काळे यांचेकडे मागणी केली होती त्यानुसार हा पाठपुरावा अकरण्यात आला होता.
कोपरगाव तालुक्यातील मागी काही वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या प्राजिमा-८ या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्यामुळे या रस्त्यावर असलेल्या सांगवी भुसार,सोनारी,मळेगाव थडी,धारणगाव,सोनारी,चास,बक्तरपूर,वडगाव या गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.त्या बाबत वरील गावातील नागरिकांनी या रस्त्याची दुरुस्ती करणेबाबत आ.काळे यांचेकडे मागणी केली होती.नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेवून त्यांनी त्याबाबत शासन दरबारी प्रस्ताव दाखल केला होता.त्या प्रस्तावाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेवून या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी सात कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.या निधीतून या रस्त्याचे मातीभराव,खडीकरण,मजबुतीकरण,डांबरीकरण,तसेच मुरूम बाजूपट्टी,कच्चे गटर्स,नवीन पाईप मोरीचे बांधकाम करणे आदी कामे केली जाणार आहे.या मंजुरी बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.