कोपरगाव तालुका
कोपरगावात आशुतोष काळे अखेर राष्ट्रवादीतूनच लढणार असल्याचे झाले स्पष्ट
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव मतदारसंघात आगामी 21 ऑक्टोबर रोजी संपन्न होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या वतीने ना-ना करत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांचीच उमेदवारी अखेर निश्चित करण्यात आली असून काल सुरेगाव येथे आयोजित मेळाव्यात त्यांनी माजी.आ. अशोक काळे यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर केला आहे.
शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वा. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, आर.पी.आय. (कवाडे गट) व शे.का.प. आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आशुतोष काळे यांनी केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव सह राज्यातील 288 जागांसाठी विधानसभेची निवडणूक येत्या 21 ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे.या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपकडून विविध पक्षाच्या सर्वाधिक चार उमेदवारांनी तिकिटासाठी मागणी केली होती.त्यात आशुतोष काळे यांचा वरचा क्रमांक होता.त्यासाठी त्यांनी आपले सर्व मार्ग खुले ठेऊन प्रयत्न केले होते.त्यात त्यांनी थेट नागपूरपर्यंत धडक मारली होती.व त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही मिळाले होते.परिणामस्वरूप त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेद्वारीकडे पाठ फिरवली होती.राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना अनेकवेळा पाचारण करूनही त्यांनी तिकडे सरळ पाठ फिरवली होती तथापि सत्ताधारी गटाने त्याच्यापेक्षा वरचढ वार केल्याने अखेरच्या क्षणी त्यांच्या ताटातील खीर पुन्हा एकदा सत्ताधारी गटाकडे गेली आहे.त्यामुळे आशुतोष काळे आता नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय निरीक्षकांच्या नजरा लागल्या होत्या.त्यांच्या समोर अपक्ष किंवा आपला पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादी पक्ष हे दोनच पर्याय शिल्लक राहिले होते.
दरम्यान राजेश परजणे यांनी आपला अर्ज वाजतगाजत दाखल करण्यासाठी आजचा चार ऑक्टोबरचा मुहूर्त काढला असून व्यापारी धर्मशाळेपासून कार्यकर्त्यांची जमा बेरीज करून त्यांची जत्रा तहसील मैदानाकडे कूच करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
त्यामुळे काल अखेर पर्यंत त्याच्या सामाजिक स्थळावरील जाहिरातीत आपल्या छबिबरोबर कोणत्याही पक्षाचे चिन्ह नव्हते.(तसे ते सत्ताधारी पक्षाचाही विश्वास नसल्याने त्यांनीही फारकत घेतलेलीच होती.) बाकी दोन प्रमुख उमेदवार विजय वहाडणे व राजेश परजणे यांचीही वेगळी स्थिती नव्हती. त्यामुळे आशुतोष काळे नेमकी कोणती काठी आणि झेंडा हाती घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून होते.त्यासाठी त्यांनी एक ऑक्टोबर रोजी कोपरगाव मतदारसंघात सत्ताधारी वर्गाची उमेदवारी जाहीर झाल्यावर महात्मा गांधी प्रदर्शन हॉल येथे शहरातील कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा पर्यंत बैठक घेऊनही उपयोग झाला नव्हता.म्हणून त्यांनी या निर्णयासाठी केवळ दोनच दिवस राहिल्याने अखेर गुरुवारी सकाळी सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत सिद्धार्थ लॉन्स येथे आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.व त्याआधी त्यांनी वरिष्ठ नेत्यांमार्फत आपला हिरवा कंदील उमेदवारीसाठी दिला होताच.फक्त औपचारिकताच केवळ तेवढी बाकी होती काल ती कार्यकर्त्यांच्या सभेने पूर्ण झाली असून त्यांची दिशा आता स्पष्ट झाली आहे.त्यामुळे कोपरगाव मतदारसंघात आता वंचित आघाडीसह पंचरंगी लढत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.विजय वहाडणे व राजेश परजणे यांच्यापुढे आता अपक्ष लढण्याशिवाय किंवा माघार घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.