कोपरगाव तालुका
कुंभारीत अपंग बांधवांना साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांना नुकताच साहित्य वाटप कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
समाजातील दृष्टीहीन,कर्णबधिर,अस्थिव्यंग,मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्या मधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसित करुन त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी,संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय,तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.त्या अंतरंग हि योजना कुंभारीत राबविण्यात आली आहे.
समाजातील दृष्टीहीन,कर्णबधिर,अस्थिव्यंग,मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्या मधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसित करुन त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी,संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय,तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षिततेसाठी अपंगांना काही क्षेत्रामध्ये आरक्षण,सवलती,सूट व प्राधान्य देण्यात आलेले आहे.या सर्वांचे उद्देश अपंग व्यक्तींना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे हा आहे.त्याला अनुसरून कुंभारी ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविला आहे.
सदर प्रसंगी कुंभारी ग्रामपंचायतने दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक साहित्य पंखे,कोरोना प्रतिबंधात्मक औषधे आदींचे वाटप कुंभारी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रशांत घुले उपसरपंच दिगंबर बडे,ग्रामपंचायत सदस्य किशोर पवार,ललित निळकंठ,किरण गायकवाड,सुनील चदंनशिव,अशिष थोरात,वसंत घुले आदी ग्रामस्थ,रमण गायकवाड,सुनील कदम,प्रकाश डांगे,ग्रामसेवक कासवे भाऊसाहेब ,ग्रामपंचायत कर्मचारी निता कदम,पैठणे ताई,रवी व्हरे,सागर लुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
आज करोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आ.आशुतोष काळे यांच्या वतीने प्रत्येक कुटुंबामध्ये सॕनीटायझर वाटप नुकतेच करण्यात आले आहे.तसेच ग्रामपंचायत कुंभारीच्या कोरोनाचा समितीच्यावतीने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” अभियानामध्ये तिसरा टप्पा पूर्ण गावाची तपासणी पार पाडण्यात आली आहे.त्याचबरोबर गावात पोलीस पाटील उल्हास मेढे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संसर्ग जनजागृती फलक गावाच्या मध्यवर्ती भागात लावण्यात आला आहे.सर्व करत असताना ग्रामपंचायत कुंभारी च्या वतीने दिव्यांग बांधवांनी आवश्यक साहित्य वाटप केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले विकासाकडे वाटचाल करत असताना सरपंच प्रशांत घुले यांनी औषध फवारणी जनजागृती मोहीम लसीकरणाबाबत विशेष आवाहन आदी उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन ग्रामस्थांना आवाहन केले आहे कुंभारी ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.