खेळजगत
आत्मा मालिकच्या 5 विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
नेवासा येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय रायफल शुटींग स्पर्धेत कोपरगाव तालुकुयातील कोकामठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील एकूण पस्तीस खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यात 14 वर्षे वयोगटातील पिस्टल शुटिंग प्रकारात कु. अनिता वसावे व रायफल शुटिंग प्रकारात कु. वैष्णवी गावित व चि. वैभव ठेगंडे तसेच 17 वर्षीय वयोगटात पिस्टल शुटिंग प्रकारात चि. विश्वदिप भालेराव व चि. शुभम इसवे या खेळांडूची पुणे येथे होणा-या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या स्पर्धेत जिल्हयातील एकूण 15 शाळेतील 225 खेळाडू सहभागी झाले होते.आत्मा मालिक संकुलातील 14 वर्षे वयोगटातील पिस्टल शुटिंग प्रकारात कु. अनिता वसावे व रायफल शुटिंग प्रकारात कु. वैष्णवी गावित व चि. वैभव ठेगंडे तसेच 17 वर्षीय वयोगटात पिस्टल शुटिंग प्रकारात चि. विश्वदिप भालेराव व चि. शुभम इसवे या खेळांडूची पुणे येथे होणा-या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख अशोक कांगणे, क्रीडा प्रशिक्षक भाग्योदय घोगरे, सागर भोजणे यांचे प्रशिक्षण तसेच आत्मा मालिक एन.डी.ए. पुर्वतयारी अकॅडमी कमाडंट मेजर रमेश भगत (सेवानिवृत्त) , उप कार्यकारी अधिकारी प्रदिप निपुंगे यांचे मार्गदर्शन लाभले होते.
या विद्यार्थ्यांचे आश्रमाचे संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज, संत विवेकानंद महाराज, संत कबीर महाराज, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश भट, प्राचार्य निरंजन डांगे, माणिक जाधव आदिंनी अभिनंदन केले आहे.