संपादकीय
जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री विखे व माजी मंत्री थोरात संघर्षात बाजी कोणाची होणार ?
संपादक-नानासाहेब जवरे,
उत्तर नगर जिल्ह्यातील 182 गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे डाव्या कालव्याच्या संगमनेर तालुक्यातील राजापूर म्हाळुंगी नदीवरील उदघाटनासाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या ताफ्यासमोर नुकतीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आ. बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी कामाचे स्रेय घेण्याच्या कारणावरून घोषणाबाजी केली.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. तरीही हि घटना आगामी राजकारणाची चाहूल देणारी आहे असे कोणालाही सहजच वाटून जाईल.मात्र हे वास्तव मानणारे खरे तर या राजकारण्यांच्या भाषेत “मूर्ख” या संज्ञेत मोडल्याशिवाय राहणार नाही.
विखे- थोरातांच्या आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत दोघांनीही आपापल्या वतनांना धक्का लागू दिलेला नाही.राजकीय लढाई तर लढायची पण त्याची झळ आपल्या संस्थानाला लागणार नाही,बुरुजापर्यंत येणार नाही याची खबरदारी घ्यायची हे तंत्र दोघांनीही पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांसारखे अवलंबले आहे,”थोडक्यात तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो ” या यांच्या राजकारणाचा मूलमंत्र राहिला असून यातून हि मंडळी विरोधकांचा अवकाश व्यापून काळे-कोल्हे सारखी तिसरी शक्ती आपल्या तालुक्यात निर्माणच होऊ देत नाही.त्यामुळे आगामी विधानसभा लढाईत त्यांच्याकडून फार मोठे एकमेकांचे पानिपत होईल या अपेक्षेत राहणे मूर्खपणाचे ठरणार आहे.
मुळात हे दोन्ही नेते ज्या मुशीत घडले ते काँग्रेस हे त्यांचे राजकारणाचे मातृगृह हे समजून घेतले कि पुढील राजकारण समजून घेणे सोपे जाईल.आ.थोरात व विखे यांचा विधानसभा राजकारणाचा प्रवेश अनुक्रमे 1985,व 1995 या दरम्यानचा आहे,एक अपक्षाकडून तर दुसरा पक्षाकडून लढून त्यांनी विधानसभा प्रवेश करते झाले.दोघानाही वडिलोपार्जित आपल्या पूर्वसुरींकडून राजकारणाचा वारसा मिळाला.त्यात सहकारी साखर कारखानदारीचे बाळकडू मिळालेले असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वारसा त्यांना ओघाने आला. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून मोठे गारुड होण्याची सूतराम शक्यता नाही.एक मात्र खरे आहे ना. विखे आपल्या राजकीय सोयीसाठी त्यांनी सरड्याला लाजवेल अशी पक्षांतरे केली आहे.तर आ.थोरातांनी निष्ठेला प्राधान्य देऊन आपली वाटचाल चालू ठेवली आहे.आता खरी लढाई हि कोण कोणाला मतदारसंघात गुंतवून ठेवतो कि,आपल्या पक्षाला राज्यात जनाधार मिळून देण्यासाठी सिमोल्लंघन करतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे.आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत दोघांनीही आपापल्या वतनांना धक्का लागू दिलेला नाही.राजकीय लढाई तर लढायची पण त्याची झळ आपल्या संस्थानाला लागणार नाही,बुरुजापर्यंत येणार नाही याची खबरदारी घ्यायची हे तंत्र दोघांनीही पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांसारखे अवलंबले आहे,”थोडक्यात तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो ” या यांच्या राजकारणाचा मूलमंत्र राहिला असून यातून हि मंडळी विरोधकांचा अवकाश व्यापून काळे-कोल्हे सारखी तिसरी शक्ती आपल्या तालुक्यात निर्माणच होऊ देत नाही.त्यामुळे आगामी विधानसभा लढाईत त्यांच्याकडून फार मोठे एकमेकांचे पानिपत होईल या अपेक्षेत राहणे मूर्खपणाचे ठरणार आहे.यांच्यासाठी वर्तमान पक्ष म्हणजे आपल्या जहागिऱ्या बनल्या आहेत.या लढाया आपल्या घराला आग लागेपर्यंत खेळायच्या नाहीत हा यांचा अलिखित नियम अद्याप त्यांनी पाळलेला आहे.त्यामुळे हि वतणे आपल्या पक्षात राहून यांनी संभाळायची पण राज्यात सत्ताबदल झाला तर एकाने दुसऱ्या पक्षात जाऊन आपल्या वतनाला धक्का लागून द्यायचा नाही हे अलिखित तत्व त्यांनी अद्याप पाळलेले दिसत आहे.
विखे -थोरात या दोघांचे कार्यक्षेत्र हे प्रवरा काठचे.दोघानाही भंडारदरा या धरणाचे पाणी मिळते.त्यांनी उपेक्षित असलेल्या आपल्या दोन तालुक्याखेरीज आणखी सहा तालुक्यातील 182 अवर्षणग्रस्त गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे कालव्याचे काम जाणीवपूर्वक होऊ दिलेले नाही. दोघेही सदरचे पाणी बंद पडलेल्या पेपर मिलच्या नावाखाली चोरून आपापल्या दारू कारखान्यांना वापरतात,या बाबत अधिकृत माहिती साखर संचालकासह जलसंपदा अधिकाऱ्यांनाही आहे पण कारवाई कोणीही करत नाही.व हे दोघेंही एकमेकांविरुद्ध आरोप करताना हे वस्र हरण होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेताना दिसतात,एवढेच नाही तर आता यांच्या रांगेत अकोलेतील आ. पिचड पितापुत्रही येऊन बसले आहे.
वर्तमान पक्षांतरे याच भावनेने झालेली आहे.आता हेच पाहाना दोघांचे कार्यक्षेत्र हे प्रवरा काठचे.दोघानाही भंडारदरा या धरणाचे पाणी मिळते.त्यांनी उपेक्षित असलेल्या आपल्या दोन तालुक्याखेरीज आणखी सहा तालुक्यातील 182 अवर्षणग्रस्त गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे कालव्याचे काम जाणीवपूर्वक होऊ दिलेले नाही. दोघेही सदरचे पाणी बंद पडलेल्या पेपर मिलच्या नावाखाली चोरून आपापल्या दारू कारखान्यांना वापरतात,या बाबत अधिकृत माहिती साखर संचालकासह जलसंपदा अधिकाऱ्यांनाही आहे पण कारवाई कोणीही करत नाही.व हे दोघेंही एकमेकांविरुद्ध आरोप करताना हे वस्र हरण होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेताना दिसतात,एवढेच नाही तर आता यांच्या रांगेत अकोलेतील आ. पिचड पितापुत्रही येऊन बसले आहे.यातील हे सर्वच एकमेकांच्या विरोधात राजकीय व्यासपीठावर दिसत असले तरी त्यांची आरोपाची पातळी या पलीकडे कधीच उतरत नाही आणि उतरण्याची शक्यता नाही.यांच्या राजकारणात सत्ता आणि पैसा हे समीकरण सिद्धांत आणि मूल्ये नैतिकतेपेक्षा सरस ठरताना दिसत आहे.यांच्या बाबतीत कुठलीही लढाई अंतिम नसते आणि कुठलाही आरंभ नेहमीच यशस्वी नसतो हे मानवी जीवनाचे सूत्र त्यांनी आपली संस्थाने सांभाळताना कायमच उरी बाळगलेले आहे.व आज भाजपाची सत्ता केंद्रात व राज्यात दुसऱ्यांदा येणार असली तरी ते एकमेकांच्या गडावर तोफा थेट भिडवणार नाही.मात्र जनतेचा मत रुपी खिसा मात्र चौकाचौकात हिंडून आपला खेळ करणाऱ्या गारुड्यासारखा रिकामा केल्याशिवाय राहणार नाही.खरे तर नेत्याची खरी ताकत हि तुम्ही तुमच्यापेक्षा कमी ताकतीच्या व कमी सामर्थ्यशाली व्यक्ती सोबत तुम्ही कसे वागता यावरून तुमचा मोठेपणा ठरत असतो.या पातळीवर हे दोन्ही नेते सपशेल नापास ठरतील.आपले काही उभे करण्यापेक्षा दुसऱ्याचे काही उध्वस्त करण्याच्या डावपेचानी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची दुरवस्था झाली आहे त्याला विखे आणि थोरात दोघेही अपवाद नाही.फरक इतकाच आहे कि विखे हे विषाने तर थोरात हे गुळाने मारणार.
एक मध्यवर्ती नेता व त्याच्या सत्ताकांक्षा पूर्तीसाठी राजकीय पक्ष असे त्याचे स्वरूप आजवर राहिलेले आहे.त्यांच्या तीन-तीन पिढ्या निवडणुकीच्या राजकारणात उतरलेल्या त्यामुळे पक्षातील किंवा त्याच्या गटातील अन्य जेष्ठांना संधी नाकारली जाते.आज आजोबा, बाप,आई,मुलगा ,सून,नातू या चक्रात यांचे राजकारण पुरते अडकलेले आहे.त्यामुळे आपला बालेकिल्ला सांभाळणे हे त्याच्या पुढचे सर्वात मोठे आव्हान असून ते त्यासाठी मोठ्या ताकतीने लढत असतात व मतदारांना मूर्खात काढत असतात.व जनतेला निवडणुकीच्या राजकारणात तात्कालिक मोहात (पैसा) अडकवून आपले साध्य सहजच साध्य करत असतात.
सामान्य माणसाचे मरण हे दोन्ही ठिकाणी ठरलेलेच आहे.एक मध्यवर्ती नेता व त्याच्या सत्ताकांक्षा पूर्तीसाठी राजकीय पक्ष असे त्याचे स्वरूप आजवर राहिलेले आहे.त्यांच्या तीन-तीन पिढ्या निवडणुकीच्या राजकारणात उतरलेल्या त्यामुळे पक्षातील किंवा त्याच्या गटातील अन्य जेष्ठांना संधी नाकारली जाते.आज आजोबा, बाप,आई,मुलगा ,सून,नातू या चक्रात यांचे राजकारण पुरते अडकलेले आहे.त्यामुळे आपला बालेकिल्ला सांभाळणे हे त्याच्या पुढचे सर्वात मोठे आव्हान असून ते त्यासाठी मोठ्या ताकतीने लढत असतात व मतदारांना मूर्खात काढत असतात.व जनतेला निवडणुकीच्या राजकारणात तात्कालिक मोहात (पैसा) अडकवून आपले साध्य सहजच साध्य करत असतात.हि निवडणूक त्याला अपवाद ठरण्याची शक्यता फार कमी असून राज्यस्तरीय पक्ष हे यांच्या पुढे दुबळे उमेदवार देण्यासाठी किंवा त्यांच्या मतदारसंघात सभा टाळण्यासाठी आपल्या थैल्या खाली करतानाची दृश्य आता नवीन राहिलेली नाही.खरे तर आपले फाटके झाकण्यासाठी दुसऱ्याचे वस्त्र ओढून त्याला विवस्त्र करणे हे खऱ्या लोकशाहीच्या संकल्पनेला काळिमा फासणारेच आहे.मात्र ते हे करण्यासाठी कधीच चुकत नाही.एकमेकाच्या मतदारसंघात लढतांना आश्वी जिल्हा परिषद गट विखेची शिर्डी मतदारसंघात येतो मात्र प्रत्येक निवडणुकीत थोरातांनी विखेंशी तडजोड केलेली आपल्याला आढळून येईल.पूर्वी पठार भाग अकोले मतदारसंघास जोडणारा होता आजही आहे तरीही पिचड पितापुत्रांना थोरातांची सातत्याने मदतच झालेली आहे.जिल्हा परिषदेत मंत्री विखेंना आ. बाळासाहेब थोरातानी सातत्याने मदतच केली आहे.तीच बाब जिल्हा बँकेला लागू होते.जिल्हा बँकेतही यांचे साटेलोटे लपून राहिलेले नाही.निळवंडे प्रकल्पाचे कालवे दोघानीही एकजिवाने आजपर्यंत हाऊ दिलेले नाही.भोजापूर पाण्याची तीच बोंब. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यांचीही गोष्ट वेगळी नाही.कार्यकर्त्यांची जीरवाजीरवी करण्यात यांचा हातखंडा आहे.एकाच्या जाळ्यातून सुटला कि दुसऱ्याच्या जाळ्यात तो जाऊन बरोबर त्याला चारी मुंड्या चित करणार हे सर्व अलिखित ठरलेले आहे.उसाच्या दरात यांनी शेतकऱ्यांना मारण्याचे ठरवलेले आहे.यात कुठलीच तडजोड होत नाही.यांनी विरोधात राहून एकमेकांच्या कारखान्यांवर चढाई केल्याचे एकही उदाहरण नाही.त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात राज्याचे लक्ष लागून राहील असे काहीच नाही.कुठल्याही परिणामाची तमा न बाळगता केवळ निवडणूका जिंकणे या आपल्याकडच्या कालातीत राजकीय संस्कृतीस आज तरी पर्याय दिसत नाही.विरोधी पक्षात राहून विधिमंडळातील विविध आयुधे वापरून जनशक्तीच्या बळावर जनतेची कामे करता येतात.यावर खरे तर यांचा विश्वास नाही त्यामुळे विरोधी पक्षात राहून सत्तेची रसगुल्ले खाणारे नेते या भागात जन्माला आले आहेत.खरे तर लोकशाही खरी ताकत मतदानात असते मात्र येथील मतदारांना याचा विसर पडलेला आहेच पण तात्कालिक मोहाने यांच्या बुद्धीवर चढणाऱ्या जळमटाने यांचा प्रत्येक निवडणुकीत स्वहस्ते वस्त्रहरण करण्याची सवय येथील मतदारांना लागलेली आहे.त्यांना स्वाभिमान कशाबरोबर खातात याचा गंध नसल्याने ते एखाद्या विरोधी नेत्याला या दोन्ही मतदार संघात मातपेटीच्या माध्यमातून नव्याने निर्माण करण्याची शक्यता फार दुर्मिळ आहे.
प्रदेशाध्यक्ष म्हणून आ.बाळासाहेब थोरात यशस्वी होतील ?
राज्यात खरे तर आक्रमक भाजपाला तोंड देण्यासाठी तेवढ्याच आक्रमक नेत्याची गरज आहे.मात्र या पातळीवर काँग्रेसकडे शुकशुकाट आहे,आजपर्यंत जगाच्या राजकीय व्यवस्थेत यशस्वी राजकीय नेत्यांचा इतिहास डोळ्यासमोर आणला तर आपल्या हे लक्षात येईल कि ज्या नेत्याकडे वक्तृत्वशैली आहे असेच नेते राजकारणात यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळते.मग विन्स्टन चर्चिल असो कि,रुझवेल्ट,बाळासाहेब ठाकरे असो कि अटलबिहारी वाजपेयी या सर्वांनीच वक्तृत्व शैलीवर देश आणि राज्यावर गारूड केलेले आहे.त्या पातळीवर काँग्रेसने दिलेले नेतृत्व सपशेल अपयशी होणारे आहे.
गत वेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ते विलासराव देशमुख गट सोडून चव्हाणांशी जमवून घेण्यात कमी पडले.विशेष म्हणजे त्यांचे विखेंशी जमत नसताना त्यांना या संधीचे सोने करता आले नव्हते.जिल्ह्यात विखे विरोधक नाही असे नाही पण त्यांना संघटित करण्यात थोरात कधीही प्रयत्नशील दिसले नाहीत.किंवा त्यांनी विरोधकांना विश्वास देऊन त्यांना शह देण्याचा प्रयत्नही कधी केला नाही.ते आज निष्ठेच्या पातळीवर जरी प्रदेशाध्यक्ष पद घेण्यात यशस्वी झाले असले तरी त्याचा काटेरी मुकुट ते किती यशस्वीपणे सांभाळू शकतील या बाबत प्रश्नचिन्ह आहे.
राहाता राहिला प्रश्न विधानसभेत आपली आयुधे वापरण्यापासून आ. थोरातांना कोणी रोखले होते.युती शासनाचे काळात आर.आर.पाटील.दिलीप वळसे पाटील,छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या गॅलरीत झोपून सरकारला सळो कि पळो करून सोडले होते त्याचा परिणाम 1999 च्या निवडणुकीत दिसून आलाच.संघटन कौशल्य या पातळीवरही ते कितपत यशस्वी होतील शंकाच आहे.गत वेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ते विलासराव देशमुख गट सोडून चव्हाणांशी जमवून घेण्यात कमी पडले.विशेष म्हणजे त्यांचे विखेंशी जमत नसताना त्यांना या संधीचे सोने करता आले नव्हते.जिल्ह्यात विखे विरोधक नाही असे नाही पण त्यांना संघटित करण्यात थोरात कधीही प्रयत्नशील दिसले नाहीत.किंवा त्यांनी विरोधकांना विश्वास देऊन त्यांना शह देण्याचा प्रयत्नही कधी केला नाही.ते आज निष्ठेच्या पातळीवर जरी प्रदेशाध्यक्ष पद घेण्यात यशस्वी झाले असले तरी त्याचा काटेरी मुकुट ते किती यशस्वीपणे सांभाळू शकतील या बाबत प्रश्नचिन्ह आहे.मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कमलनाथ यांनी जी जबाबदारी पार पडली कि राजस्थानात गेहलोत यांनी जी जबाबदारी आता मायावतीच्या दहा आमदारांना आपल्याकडे वळविण्यात स्पष्ट बहुमतासाठी आमदार जुळविण्यात जी भूमिका पार पाडली त्याने भाजपाला चांगलाच धक्का बसला आहे.त्यातून त्यांचे कर्तृत्व उठून दिसले आहे.या पातळीवर अद्याप प्रभावी नेत्याचा पक्षप्रवेश करण्यात अजूनही थोरात चाचपडतांनाच दिसत आहे.त्यामुळे त्यांच्याकडून काँग्रेसने फार अपेक्षा न बाळगणे उत्तम.