जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावातील रुग्णवाढ बनली चिंतेचे कारण

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.राज्यात व देशात हजारोहून जास्त कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरंगाव तालुक्यातुन नगरला तपासणी साठी ६९ श्राव पाठवले असून तेथून तपासून आलेल्या अहवालात ०० बाधित रुग्ण आहे तर खाजगी प्रयोग शाळेतून तपासणी केलेल्या अहवालात ५० तर एकूण रॅपिड टेस्ट ७६ रॅपिड टेस्ट करण्यात येऊन त्या मधून १४ असे एकूण ६५ रुग्ण बाधित रुग्ण आढळल्याने आकडा खाली आला असला तरी कोरोनाचा वाढणारा विक्रम थांबत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.आज आलेल्या अहवालात ६५ रुग्णांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.असल्याने कोपरगाव शहर पुन्हा एकदा उचांकी रुग्णवाढ होत आहे.प्रशासनाला रुग्ण वाढीला आळा घालण्यात अपयश येत असून शहर व तालुका टाळेबंदीकडे वेगाने वाटचाल करीत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशाने दहावी-बारावी वगळता शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून शिवसेनेने या कोरोनाच्या वाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०४ हजार ५६१ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ५३८ असून आज पर्यंत ५२ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.१४ टक्के आहे.तर एकूण २४ हजार ४४२ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ९७ हजार ७६८असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १८.६६ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०४ हजार ०२७ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८८.२९ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आज आलेल्या आकडेवारीने काहीसा दिलासा मिळाला आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ९२ हजार ४२० झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०८ हजार ११७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ८३ हजार १०० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार २०२ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-६३ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.

कोपरगाव शहरातील एकूण ३८ रुग्ण असून त्यात खडकी पुरुष वय-६५,कोपरगाव पुरुष वय-२५,३२,५९,४५,महिला वय-१४,२०,६०,१५,शीतल बिल्डिंग महिला वय-३८,गजानननगर पुरुष वय-४३, लक्ष्मीनगर महिला वय-२४,धारणगाव पुरुष वय-६४,५८,महिला वय-६९,वडांगळे वस्ती पुरुष वय-६३,रेव्हून्यू कॉलनी पुरुष वय-३२,गोकुळनगरी पुरुष वय-४१,ओमनगर पुरुष वय-६३,२८,६०,महिला वय-५७,शिवाजी रोड पुरुष वय-४७,समतानगर पुरुष वय-५९,बाजारतळ पुरुष वय-५४,येवला रोड महिला वय-६२,निवारा पुरुष वय-५२,कापड बाजार पुरुष वय-६०,सुभाषनगर पुरुष वय-३१,बँक रोड पुरुष वय-५६,२६,इंदिरापथ पुरुष वय-४४,जानकी निवास पुरुष वय-५५,महिला वय-५१,फादरवाडी पुरुष वय-२०,गांधीनगर महिला वय-५८,१५,स्टेशन रोड पुरुष वय-५६,आदींचा समावेश आहे.

कोपरगाव तालुक्यातील बाधित रुग्ण येसगाव पुरुष वय-७५,महिला व य-२२,४६,सडे पुरुष वय-२२,२२,लौकी महिला वय-२१,धोत्रे पुरुष वय-६२,दहेगावं पुरुष वय-३५,मळेगाव पुरुष वय-७०,करंजी पुरुष वय-२९,४३,हिंगणी पुरुष वय-६०,महिला वय-५४,मुर्शतपुर पुरुष वय-५४,जेऊर पाटोदा महिला वय-५३,कोळपेवाडी पुरुष वय-२९,४५,माहेगाव पुरुष वय-६०,कोकमठाण पुरुष वय-२९,पुणतांबा महिला वय-२९, वारी पुरुष वय-६४,२४,महिला वय-४९,टाकळी महिला वय-२५,कुंभारी पुरुष वय-२५,आदींचा समावेश आहे.

आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असून गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आता आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले आहे.सरकारने तसे नुकतेच नवीन नियम जाहीर केले आहे.मात्र उत्तोरोत्तर रुग्णवाढीचा आळा घालण्यात अपयश येत आहे.त्यामुळे आता कोपरगाव सह दहावी-बारावी वगळता शाळा जिल्ह्याधिकाऱ्यांनी बंद केल्या आहेत.त्यामुळे तालुक्यात नागरिकांत मोठी चिंता वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close