निधन वार्ता
माजी मंत्री दिलीप गांधी यांच्या पार्थिवाला कोपरगावात श्रद्धांजली
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे दिल्लीत निधन झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली असून त्यांच्या पार्थिवाला आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास कोपरगाव साईबाबा कॉर्नर येथे नगराध्यक्ष विजय वहाडणे व भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य रवींद्र बोरावके यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली असून त्या नंतर त्यांचे पार्थिव नगरच्या दिशेने नेण्यात आले आहे.
“माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी हे जण सामान्यांतुन पुढे आलेले नेतृत्व होते.त्यांनी नगर जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले होते.त्यांच्या निधनाने राज्यासह भाजपचे मोठे नुकसान झाले आहे”-रवींद्र बोरावके माजी जिल्हाध्यक्ष भाजप.
माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे काल पहाटे दिल्ली या ठिकाणी कोरोनावर उपचार असताना निधन झाले आहे. ते दिल्लीत गेले असताना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. दिल्लीत खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. १७ मार्च रोजी त्यांनी पहाटे गुरुग्राम दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला होता.
त्यांच्या निधनाने कोपरगावातील निष्ठावान भाजपच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता.त्यांचे पार्थिव आज सकाळी दिल्लीहून नगरच्या दिशेने नेण्यात आले.त्यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,भाजपचे राज्य कार्यकरिणी सदस्य रवींद्र बोरावके,माजी शहराध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे,विनायक गायकवाड,माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे,नामदेवराव जाधव,माजी नगरसेवक संजय कांबळे,प्रा.प्रमोद पाटील , प्रभाकर वाणी, हिरालाल महानुभव, विनित वाडेकर, राजेंद्र खैरे,दिलीप घोडके,सुरेश कागुणे,अनिल वायखिडे,चेतन खुबानी,किरण थोरात,योगेश वाणी,आदीं मान्यवरांसह नागरिक,व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थितांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.व आपल्या नेत्याला अखेरची श्रद्धांजली अर्पण केली आहे.