जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

फळ प्रक्रिया उद्योगातून आर्थिक सक्षम होण्याची महिलांना संधी-प्रेरणा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्य शासनाने फळ प्रकिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना सुरु केल्या असून अनेक शेतकरी फळ प्रकिया उद्योगाकडे वळले आहेत.मात्र या उद्योगासाठी प्रशिक्षित कामगार उपलब्ध होत नाही.त्यामुळे फळ प्रकिया प्रशिक्षणातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याची संधी असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या पुष्पाताई काळे यांनी नुकतेच कोपरगाव तालुक्यातील पढेगावात येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

फळ प्रक्रिया उद्योग हा फळे अधिक काळासाठी साठवून ठेवण्यासाठीची प्रक्रिया करण्याचा उद्योग आहे.हा शेतीपूरक व्यवसाय आहे तसेच यासाठी मोठे कारखानेही असतात.फळांचे काप सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात ठेवून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करता येते.या उद्योगाकडे शेतकरी व ग्रामीण भागातील महिलांचे दुर्लक्ष आहे याकडे या उपक्रमातून लक्ष वेधून घेण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून आत्मा अंतर्गत कौशल्याधारीत कामे करणाऱ्या शेतमजूर व शेतकऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत महिलांना फळे व भाजीपाला प्रक्रिया या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पढेगाव येथे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या प्रसंगी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,नगरसेविका वर्षा गंगूले,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,कृषी पर्यवेक्षक सुनील गावित,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) शैलेश आहेर,कृषी सहाय्यक तुषार वसईकर आदींसह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.

यावेळी तज्ञ प्रशिक्षक सतीश नेने यांनी महिलांना फळ प्रक्रिया उद्योगासंदर्भात प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.प्रक्रिया उद्योगातील संधी व गरज यावर मार्गदर्शन करून फळे व भाजीपाला यावर करण्यात येणाऱ्या विविध प्रक्रिया यावर सखोल माहिती दिली.सर्व फळांच्या विविध प्रक्रिया समजावून सांगितल्या तसेच विविध यंत्रसामग्रीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रक्रियेची प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थित महिलांना माहिती दिली.तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश आहेर यांनी केले.यावेळी उपस्थित महिलांनी शेतावर शिवार फेरी करून विविध औषधी वनस्पतींची व पिकांची माहिती घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close