जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

पारगाव-भातोडीत युवा केंद्राची स्थापना करा-या आमदारांची मागणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरालगत प्रस्तावित असलेल्या क्रीडा उपसंकुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा तसेच अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील पारगाव-भातोडी या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावात स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले युवा केंद्राची उभारणी करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी पर्यटन व क्रीडा राज्यमंत्री ना.आदीती तटकरे यांच्याकडे नुकतीच केली आहे.

“पारगाव-भातोडी येथे झालेल्या लढाईत शहाजीराजे भोसले यांनी गनिमी कावा वापरत शत्रूवर विजय मिळवला व त्यानंतर शहाजीराजांचा देशभर दबदबा तयार झाला.स्वराज्याची मुहूर्तमेढ म्हणून ओळख असलेल्या पारगाव-भातोडी याठिकाणी स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या नावाने युवा केंद्राची उभारणी करण्यात यावी”-आ.आशुतोष काळे.

पर्यटन व क्रीडा राज्यमंत्री ना.आदीती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि.१८ रोजी पार पडलेल्या बैठकीसाठी आ.काळे यांनी उपस्थित राहून या बैठकीत कोपरगाव शहराच्या क्रीडा उपसंकुलाबाबत तसेच अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील पारगाव-भातोडी या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावात स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले युवा केंद्राची उभारणी करण्याबाबत मागणी मांडली आहे.

कोपरगाव शहरातील तरुणाईला सोयीस्कर होईल असे कोपरगाव शहरालगत क्रीडा उपसंकुल होणे गरजेचे आहे.कोपरगाव शहरात अनेक खेळात पारंगत असलेले खेळाडू असून त्यांना नियमित सरावासाठी व विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण घेण्यासाठी कोपरगाव शहरात सुविधा उपलब्ध नाही. कोपरगाव शहरालगत क्रीडा संकुल व्हावे अशी कोपरगाव शहरातील तरुणाईची मागणी आहे.कोपरगाव शहरालगत खेळाडूंना उपयोगात येईल अशा प्रस्तावित असलेल्या क्रीडा उपसंकुलासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास त्याठिकाणी खेळाडू सराव करू शकतील त्यासाठी क्रीडा उपसंकुल होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी पर्यटन व क्रीडा राज्यमंत्री ना.तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.त्याबाबत पर्यटन व क्रीडा राज्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे.

तसेच अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पारगाव-भातोडी या गावात स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले युवा केंद्राची उभारणी करावी याकडे देखील पर्यटन व क्रीडा राज्यमंत्री.ना.तटकरे यांचे आ.काळे यांनी लक्ष वेधले.पारगाव-भातोडी येथे झालेल्या लढाईत शहाजीराजे भोसले यांनी गनिमी कावा वापरत शत्रूवर विजय मिळवला व त्यानंतर शहाजीराजांचा देशभर दबदबा तयार झाला.स्वराज्याची मुहूर्तमेढ म्हणून ओळख असलेल्या पारगाव-भातोडी याठिकाणी स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या नावाने युवा केंद्राची उभारणी करण्यात यावी त्यांनी ना.आदीती तटकरे यांच्याकडे केली. सदर मागणीस मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती आ.काळे यांनी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close