जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तृतीयपंथीयांचा धिंगाणा,माजी नगरसेवक पतीला मारहाण ?

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सोमवार दि.०१ मार्च रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सुभाषनगर येथील तृतीय पंथीयांच्या दोन गटात झालेल्या तक्रारींच्या निवारणार्थ आलेल्या दोन गटाने शब्दशः (अर्ध नग्न ) मद्यधुंद होऊन नंगानाच केल्याची माहिती मिळाली असून त्या बाबत लक्ष्मीनगर येथील एका महिला नगरसेवकाच्या पतिने तेथे त्यांची चलचित्रण (व्हिडीओ शूटिंग) केल्याचा संशय आल्याने त्यांनी आणखी हंगामा केल्याची विश्वसनीय माहिती मिळाली असून याला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.त्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मात्र शहरात मात्र या माजी नगरसेविकेच्या पतीला मारहाण झाल्याची अफवा पसरली होती.याबाबत आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शहानिशा केली असता त्यांनी यास नकार दिला असून आपल्यावर त्यांनी “तसा” संशय व्यक्त केला होता,मात्र आपण तेथे उपस्थित ठाणे अमलदाराकडे आपला भ्रमणध्वनी देऊन त्यांच्या शंकेचे निरसन केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

देशातील तृतीयपंथीयांना सामाजिक समता मिळून त्यांचे आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरण होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.समाजाकडून होणारा त्यांचा उपहास,अवहेलना थांबवणारे तृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयक,२०१९ गतवर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले आहे.अनेक ठिकाणी आमदार,आता तृतीयपंथी सरपंच म्हणून नियुक्ती झाली असताना कोपरगावात मात्र हि मंडळी वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात नगरपरिषदेचा रस्त्यांच्या कामाच्या निविदा भाजपने कोल्हे गटाने फेटाळल्या असल्याने नगराध्यक्ष विजय वहाडणे व राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वाद ऐन रंगात आलेला असतांना सोमवारी रात्री आणखी एका वादाने शहरात चांगलाच रंग भरला आहे.त्याचे झाले असे की,सुभाषनगर या उपनगरात काही तृतीयपंथी नागरिक राहातात त्यांच्यात एक ‘अनाहूत’ पाहुणा आल्याने व त्यांच्यात काही नाजूक प्रकरणावरून वाद रंगला होता.वाद “असा-तसा”नव्हता तर तो मदिरेला सोबत घेऊन झाला असल्याने त्याला “भलताच” बहर आला होता.व तो कोणाच्या आवाक्यात राहिलेला नव्हता हे विशेष ! दरम्यान या अनाहूत पाहुण्यांचा वाद काही मिटता मिटेना त्यामुळे त्यांनी अखेर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यावेळी तेथे लक्ष्मीनगर येथील एका सत्ताधारी भाजच्या गटाच्या माजी महिला नगरसेवकांचा पती काही तरुणांचे भांडण झालेले असल्याने व त्याना ते सोडविण्यासाठी फोन आल्याने “ते” मिटविण्यासाठी आले होते.आधीचे तृतीयपंथी त्यांचा वाद मिटविण्यासाठी थेट ठाणे अंमलदाराकडे गेले मात्र त्यांच्या आरोप-प्रत्यारोपांचा गलका एवढा मोठा होता की कोणाचे कोणाला काहीही ऐकू येत नव्हते.या किन्नरांचे आपल्या अंगाभोवतीच्या वस्रप्रावरणांचे भान सुटले होते.त्यामुळे हजर पोलीस अधिकाऱ्यांना आपले डोळे झाकण्याचा अनास्था प्रसंग गुदरला होता.त्यांना आवरणे मोठे जिकरीचे बनले होते.त्यांना कसे-बसे बाहेर काढून दिले असताना त्या ठिकाणीच ते बाहेर ठाणे अमलदाराचे खिडकीपाशी भांडत असताना माजी नगरसेवकचे पती महाराज पोलीस दरबारी आले व त्यांनी ठाणे अंमलदाराच्या खिडकीपाशीच आपला भ्रमणध्वनी कानाला लावलेला असताना ते कुणाशीतरी बोलत असताना बाहेर उभे राहून भांडत असलेल्या काही किन्नरांना आपली चलचित्रण फित (व्हिडीओ शूटिंग) होत असल्याचा संशय आला.त्यांनी आपसातील वाद सोडून दिले आणि आपला मोर्चा हा “या” माजी नगरसेविकेच्या पतीकडे वळवला त्यांना धक्का बुक्की झाल्याची वदंता असून त्याने या गोंधळात आणखीच भर पडली.त्यामुळे त्यांना बाहेर काढणे मोठे जिकरीचे बनले होते.मात्र तेथे नुकतेच बढतीवर बदलून गेलेले मात्र अद्याप येथेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अधिकारी यांनी मोठी मिनतवारी करून त्यांना वाटे लावले व सुटकेचा श्वास सोडला आहे.दरम्यान याबाबत कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला असून त्या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close