सामाजिक उपक्रम
लोहगावचा विकास इतर गावांना प्रेरणादायी-माजी मंत्री
जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-(प्रतिनिधी)
लोहगाव ग्रामपंचायतच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून व प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर गावचा चेहरा-मोहरा बदलेल बदलला आहे.जिह्यातील इतर गावांनी आदर्श घेण्यासारखे काम झाले आहे असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी एका कार्यक्रमात बोलताना काढले आहे.
” स्वर्गीय खा.बाळासाहेब विखे पाटील यांचे लोहगाव हे लाडके गाव आहे.ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास कामे झाल्यामुळे गावचा कायापालट झालेला आहे. स्मार्ट ग्राम भाग घेतला असता तर चाळीस लाखांचा पुरस्कार मिळाला असता-शालिनी विखे,माजी अध्यक्षा,जि.प.
राहाता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामाच्या उद्घाटन माजी मंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, सभापती नंदा ताई तांबे,कविता लहारे,बबलू म्हस्के,माजी संचालक लहानु चेचरे,भाऊसाहेब चेचरे,बाबासाहेब चेचरे,सरपंच स्मिताताई चेचरे,उपसरपंच सुरेश चेचरे,माजी सरपंच गणेश चेचरे,वैशाली गिरमे,निर्मलाताई दरंदले,सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे,ग्रामसेविका सौ सूर्यवंशी मॅडम आदी मान्यवरांसह बहू संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोव्हिड मुळे दिवस बदलत चाललेले आहे.लाखो लोकांच्या नोकऱ्या गेले आहे सत्ता येते जाते परंतु कोव्हिड मुळे मोठा बदल झालेला आहे.काळ कोणासाठी थांबत नाही.मराठवाडा,विदर्भात जिल्ह्यात टाळेबंदी होण्याची शक्यता निर्माण होत आहे.संयमाने शांततेने काम करण्याची गरज आहे.आपल्या आता रोजगार निर्माण करण्याची गरज आहे चांगले काम केले तर लोकांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. कारखाना व कारखानदारी रोजगाराची मर्यादा आल्या आहे.त्यामुळे नवीन उद्योग उभारण्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे.आदिवासी बांधवांसाठी लोणीच्या धर्तीवर घरकुल योजना तयार केली पाहिजे.त्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. योजनेचा तुटवडा नाही परंतु प्रयत्न सातत्याने चालू ठेवणे गरजेचे आहे. गावातील आपआपसातील वैरभाव पहिले संपवा.गाव तरी किती आहे इकडून निघाले तर तिकडे संपते त्यात एवढी भांडणे ? दिवस मान बदलले आहे. आपणही बदल केला पाहिजे.आपण स्वतः येणाऱ्या तरुण पिढीसाठी सर्वांनी एकाच रस्त्याने जाण्याची गरज आहे व जाते परंतु विकास हा थांबायला नको.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे म्हणाल्या की,” स्वर्गीय खा.बाळासाहेब विखे पाटील यांचे लोहगाव हे लाडके गाव आहे.ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास कामे झाल्यामुळे गावचा कायापालट झालेला आहे. स्मार्ट ग्राम भाग घेतला असता तर चाळीस लाखांचा पुरस्कार मिळाला असता.सर्वांच्या सहकार्याने गावचा कायापालट झालेला आहे.इथून पुढे अशीच एकी ठेवून गावचा विकास करा.
सदर प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के म्हणाले कि,” गावचा सर्वदूर विकास झालेला आहे.सर्व गावांनी आदर्श घ्यावा असा गावचा चेहरामोहरा बदललेला आहे. कार्यक्रमास तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानदेव चेचरे,भाऊसाहेब चेचरे,वसंतराव चेचरे,गणपतराव चेचरे,सोपान चेचरे, भास्कर चेचरे,राजेंद्र इनामके,संजय चेचरे, शांताराम चेचरे, बाळासाहेब चेचरे,किशोर गिरमे,सतिश गिरमे,संजय सुरडकर,विलास गोपाळे,रावसाहेब चेचरे,कृष्णा चेचरे, भाऊसाहेब चेचरे,अनिल चेचरे,चागदेव पगारे,सुरेश खरात, रोहिदास चेचरे,अशोक चेचरे,आण्णासाहेब चेचरे, बाळासाहेब वांगे,ज्ञानदेव दरंदले,विठ्ठल दरंदले,बाळासाहेब दरंदले,किरण चेचरे,रंजित इनामके,जिल्हा परिषद शाळेच्या डिंबरताई,श्री शेवाळे,श्री गिते,श्री रांधवने,श्री घोरपडे,सुमन चेचरे,दयाबाई बोर्डे,रमाबाई सोनवणे, नंदाताई माळी,अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते,
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय इनामके यांनी तर उपस्थितांचे आभार सुुुुरेश चेेचरे यांनी मानले आहे
.