कोपरगाव तालुका
अंत्यविधीसाठी पालिकेने पुढाकार घ्यावा-कोपरगावात मागणी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डीत नगरपरीषदेचे अध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य नागरपरिषदेमार्फत देण्याची घोषणा नुकतीच केलेली असताना आज कोपरगाव नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती ताराबाई जपे यांनीही अशीच मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे केल्याने या मागणीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
मात्र वर्षभर कोरोना कालखंडात मृत्यू किती विदारक असतो हे यासाथीने दाखवून दिले आहे.अनेकांना आपल्या नजीकच्या माणसांच्या अंत्यविधीला उपस्थित राहाता आले नाही.त्यामुळे हे आघात त्यांना अनेक पिढ्या स्मरणात ठेवावे लागणार आहे.यासाथीने अनेकांचे रोजगार हिरावुन घेतले आहे.त्यामुळे अनेकांना आपली स्थिती म्हणजे अवघडजागेचे दुखणे बनले आहे.या पार्श्वभूमीवर हि मागणी आली आहे.
मृत्यू म्हणजे जीवित प्राण्याच्या शरीरातील त्या सर्व जैविक क्रियांचा अंत ज्या त्याला जिवंत राहण्यास मदत करतात.मृत्यूनंतर शरीराचे कार्य थांबते व प्राणी निष्क्रिय होतो.मृत्यूनंतर शरीराचे हळूहळू विघटन होण्यास सुरुवात होते.जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू अपरिहार्य आहे.माणसाचा मृतदेह पुरणे,जाळणे,पशुपक्ष्यांच्या ताब्यात देणे नदीला किंवा समुद्राला अर्पण करणे इत्यादी प्रथा निरनिराळ्या समाजात रूढ आहेत.हा अंत्यविधी करण्यापूर्वी मृत देहावर अखेरचे कौटुंबिक,सामाजिक आणि धार्मिक संस्कार करण्यात येतात.मृत्यूनंतर विशिष्ट दिवशी आप्त आणि अन्य लोक जमा होतात आणि विशिष्ट धार्मिक किंवा तशाच प्रकारचे काही विधी करतात.याशिवाय मृतव्यक्तीचे मासिक,त्रैमासिक किंवा वर्षश्राद्ध करण्याची पद्धत हिंदूंमध्ये आहे.अन्य लोक ठरावीक दिवशी मृताच्या स्मृतीनिमित्त किमान त्याच्या तसबिरीला हार घालतात.या सर्व विधींच्या मागे मृत व्यक्तीला आपल्या सद्भावना,श्रद्धा,आपले सन्मान पोहचावेत अशी इच्छा असते.म्हणजे त्या व्यक्तीच्या जिवाला किंवा आत्म्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे गृहीत धरलेले असते.मृतात्म्याला सद्गती लाभो,किंवा शांती मिळो, त्याचा पुढचा प्रवास सुरळीत होवो अशी इच्छा त्या मृत जिवापर्यंत पोहोचते अशी लोकांमध्ये समजूत असते.त्यामुळे मरण पावलेल्या माणसाचा अंत्यविधी करणे हि बाब प्रथा वेगवेगळ्या असतील सर्वधर्मसमंत आहे.त्यामुळे अंत्यविधिस अनन्य साधारण महत्व आहे.
मात्र वर्षभर कोरोना कालखंडात मृत्यू किती विदारक असतो हे यासाथीने दाखवून दिले आहे.अनेकांना आपल्या नजीकच्या माणसांच्या अंत्यविधीला उपस्थित राहाता आले नाही.त्यामुळे हे आघात त्यांना अनेक पिढ्या स्मरणात ठेवावे लागणार आहे.यासाथीने अनेकांचे रोजगार हिरावुन घेतले आहे.त्यामुळे अनेकांना आपली स्थिती म्हणजे अवघडजागेचे दुखणे बनले आहे.त्यामुळे सांगता येईल आणि दाखवताही येईना अशी अवस्था झाली होती.त्यातून अनेक सामाजिक संस्थांनी याबाबत पुढाकार घेऊन हि समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यातूनच शिर्डी येथील भाजपचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी याबाबत पुढाकार घेऊन शिर्डी येथील मृत्यू पावलेल्या नागरिकांचा अंत्यविधी करण्याची जोखीम हि पालिकेच्या अंगावर घेतली आहे.अशीच मागणी आता कोपरगाव येथील महिला बाल कल्याण समितीच्या सभापती ताराबाई जपे यांनीही केल्याने त्याकडे अनेकांचे डोळे लागले आहे.नगरपरिषद याबाबत आता काय भूमिका घेते याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.