कोपरगाव तालुका
कोपरगाव शहरात डॉ.आंबेडकरांना मानवंदना
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथे आज संविधान दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली आहे.त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो.२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्सामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो.२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्सामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सूपुर्द केले,२६ नोव्हेंबर १९४९.भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातोभारतीय संविधान दिनानिमित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली आहे.
सदर प्रसंगी संविधान प्रतीचे वाचन करण्यात आले आहे.या वेळी भन्ते अनंतसुमन सिरी,भन्ते कश्यप,विश्वकर्मा समाजाचे प्रदेश अध्यक्ष संजय सुर्यवंशी,श्रमिकराज कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय विघे,आर.पी.आय.महाराष्ट्र सचिव दीपक गायकवाड,रंभाजी रणशूर,नितीन त्रिभुवन,राहुल धिवर,अडँ.सुरेश मोकळं,अँड.नितीन पोळ,गणेश पवार,बुद्धिस्ट यंग फोरचे अध्यक्ष विजय त्रिभुवन,विजय भातानकर,विलास गवळी,माजी.नगरसेवक अरविंद विघे,मनोज त्रिभुवन,राजेंद्र पगारे,संभाजी रनशूर,गणेश पवार,राजेंद्र उशीर,कैलास साळवे,भाऊसाहेब शिंदे,नितीन शिंदे,कूनाल झल्ट,सुनीता पवार,सविता साळवे,सविता वाघ यांचे सह महिला,मान्यवर उपस्थित होते.