कोपरगाव तालुका
..त्या निर्णयाचे साखर कामगारांनी केले स्वागत
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी साखर कामगारांना दिवाळी निमित्त दिलेला १८ टक्के बोनस व साखर कामगारांच्या वेतन वाढ जाहीर केल्याबद्दल त्यांच्या या भूमिकेचे कोपरगाव तालुका साखर कामगार सभेच्या वतीने नुकतेच स्वागत करून त्यांचा सत्कार केला आहे.
कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी कामगारांना आगामी दिवाळी निमित्त अठरा टक्के बोनस जाहीर केला आहे.त्यांच्या या उपक्रमाचे कामगारांनी स्वागत केले आहे.त्यांनी या कार्यक्रमात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम व कामगारांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला देऊन शेतकरी व कामगारांप्रती चांगुलपणाची भावना जपली आहे-अरुण पानगव्हाने,कामगार प्रतिनिधी
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा नुकताच गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न झाला आहे.या कार्यक्रमात कारखान्याचे अध्यक्ष व आ.आशुतोष काळे यांनी कामगारांना आगामी दिवाळी निमित्त अठरा टक्के बोनस जाहीर केला आहे.त्यांच्या या उपक्रमाचे कामगारांनी स्वागत केले आहे.त्यांनी या कार्यक्रमात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम व कामगारांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला देऊन शेतकरी व कामगारांप्रती चांगुलपणाची भावना जपली आहे.या कारखाण्याचा वारसा कारखान्याचे अध्यक्ष आ.काळे यांनी पुढे चालवत यावर्षी कोरोना संकट असतांना देखील साखर कामगारांना १८ टक्के बोनस देवून साखर कामगारांच्या वेतन वाढीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. शासनाने नेमलेल्या त्रिपक्षीय कराराची मुदत संपली आहे.साखर कामगारांच्या वेतनाबाबत त्रिपक्षीय समितीने अजून ठोस निर्णय घेतलेला नाही.शासनाने त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा आपण त्याची अंमलबजावणी करू असे जाहीर सांगणारे ते राज्यातील सहकारी साखर कारखान्याचे एकमेव अध्यक्ष असल्याचा दावा कोपरगांव तालुका साखर कामगार युनियनचे महासचिव नितीन गुरसळ यांनी सांगितले आहे.
याप्रसंगी कामगार प्रतिनिधी अरुण पानगव्हाणे,उपाध्याक्ष विक्रांत काळे,सचिव प्रकाश आवारे,कायदेविषयक सल्लागार विरेंद्र जाधव,खजिनदार संजय वारुळे आदि मान्यवर उपस्थित होते.