कोपरगाव तालुका
खिलारी यांच्या “त्या”वक्तव्याचा तलाठी महासंघाकडून निषेध
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तहसील कार्यालयात आज आ.आशुतोष काळे यांनी आयोजित केलेल्या आमसभेत जेष्ठ कार्यकर्ते राजेन्द्र खिलारी यांनी आज महसूल कार्यालयाच्या भोंगळ कारभारावर आज कठोर भाषेत आसूड ओढले असून नागरिकांना विनाकारण वेठीस धरले जात असून चुकीचे पिकांचे पंचनामे व पाहणी अहवाल तयार करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली होती मात्र त्यांनी आपले म्हणणे मांडताना असंसदीय भाषेचा वापर केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव तलाठी महासंघाने त्यांचा तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,आज आ.काळे यांनी महसूल,भूमी अभिलेख,सहाय्यक निबंधक,दुय्यम निबंधक आदीं विभागाचा कारभाराचा आढावा घेण्यासाठी आढावा घेण्यासाठी आमसभेचे आयोजन केले होते.त्यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती पाहून आपल्या समस्या मांडल्या असून त्यात सर्वाधिक महसूल विभागाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले त्या वेळी लौकी येथील जेष्ठ कार्यकर्ते राजेंद्र खिलारी यांनी तलाठी या घटकाबद्दल बोलताना असंसदीय भाषेचा वापर केल्याचा तलाठी संघाचा आरोप आहे त्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
त्यावेळी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,जेष्ठ संचालक पद्मकांत कुदळे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,माजी गट नेते डॉ.अजय गर्जे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,जि. प.सदस्य सुधाकर दंडवते,पंचायत समिती सदस्य श्रावण आसने,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,जिनिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले, युवा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे,सुनील शिंदे,प्रशांत वाबळे,आदींसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्य तलाठी संघाच्या कोपरगाव शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,”सर्व बैठक आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थित व शांततेत पार पडली असताना लौकी येथील कार्यकर्ते राजेंद्र खिलारी यांनी असभ्य भाषेचा वापर केला आहे.व या पुढे असा असंसदीय भाषेचा वापर केला तर आमची संघटना या बैठकीवर बहिष्कार टाकेल असा इशारा दिला आहे.निवेदनावर जिल्हाध्यक्ष डी. बी.भुजबळ,तालुका अध्यक्ष बी.ए.बडदे,उपाध्यक्ष एन.आर.जावळे,कार्याध्यक्ष वाय. बी.तांगडे,चिटणीस संदीप ठाकरे,तलाठी डी. जी.पऱ्हाड,एस.बी.चाकणे, एम.आर.सानप, जी.एस.गर्कल, पी.एस.भुरे,एस.पी.लहाने,पी.एस.डहाळे,एस.सी.थोरात,पी.एल.कदम आदींच्या सह्या आहेत.