जाहिरात-9423439946
कृषी विभाग

मार्गदर्शनासाठी कृषीदूत शेतकऱ्यांच्या बांधावर

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील १५ चारी येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत एम.जी.एम.कृषी महाविद्यालय गांधेली,औरंगाबाद येथील कृषीदूत रोहन वाकचौरे यांनी शेतकऱ्यांना ‘शुन्य उर्जेवर चालणारी शितकपाटे’ (ZERO ENERGY COLL CHAMBER) याबद्दल माहिती सांगितली. त्याची उभारणी कमीत कमी आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून करता येते याचे एक प्रात्यक्षिक देखील दाखवून दिले आहे. त्याचे विविध उपयोग तसेच वापरासमबंधी मार्गदर्शन केले आहे.

तसेच बीज प्रक्रियेची पद्धत समजावून सांगितली. त्यापासून होणारे फायदे आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रायझोबियम बद्दल माहिती सांगितली. शेतकऱ्यांनी माती परिक्षण करणे जरुरीचे आहे हे समजावून सांगितले आहे.
त्याचप्रमाणे गाईंच्या गोठ्यात करावयाची स्वछता त्यांना लागणाऱ्या चाऱ्याच्या व्यवस्थापणाविषयी विविध गोष्टी सांगितल्या. विविध आजारांच्या लसीकरणाची माहिती दिली.शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

या कामासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एम.म्हस्के, ग्रामीण कृषी कार्यानुभव अधिकारी व्ही.ओ.कोहिरे-पाटील,मोनाली लवराळे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. या वेळी गावातील शेतकरी अमोल सदाफळ,राजेंद्र दंडवते,हेमंत सदाफळ,नितीन सदाफळ, बाळू लुटे व इतर शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Close