कोपरगाव तालुका
कोपरगावात राष्ट्रवादीचा वर्धापन उत्साहात संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे रक्तदान शिबिर नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले आहे. तसेच यावेळी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.
यावेळी कोरोनाच्या लढ्यात प्रसंगी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या महिला डॉक्टर,आशा सेविका,आंगणवाडी सेविका,सफाई कर्मचारी यांचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांनी सुरक्षित अंतर पाळत रक्तदान केले आहे.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे,सर्व संचालक, पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन काळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,शहराध्यक्ष सुनील गंगूले,युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त शिनगर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,नगरसेवक,सर्व सेलचे अध्यक्ष,पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक सुरक्षित अंतर पाळुन उपस्थीत होते.