कोपरगाव तालुका
समृद्धी महामार्गावरील एकाचे निधन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गावर धोत्रे ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता कामावर असताना आज सकाळी ठेकेदाराचा बिहार येथील परप्रांतीय पर्यवेक्षक चनारीक मुखलाल राय ( वय-५२) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे.कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रसंगी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील डेसरी तालुक्यातील पाणापुर या गावातील पर्यवेक्षक पदावर काम करत असलेला इसम होता.तो कामावर असताना सकाळच्या अकरा वाजेच्या सुमारास त्यानां धोत्रे ग्रामपंचायत हद्दीतील मेडिकल समोर अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता त्यात त्यांचे निधन झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,राज्य सरकारचा महत्वाकांक्षी असलेल्या सुमारे ५६ हजार कोटी रुपयांच्या मुंबई-नागपूर या ७१० की.मी.समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.या कामावर राज्यातील मजूर आहेच पण अद्याप परप्रांतीय मजूरही बहू संख्येने आहे.यात बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील डेसरी तालुक्यातील पाणापुर या गावातील पर्यवेक्षक पदावर काम करत असलेला इसम होता.तो कामावर असताना सकाळच्या अकरा वाजेच्या सुमारास त्यानां धोत्रे ग्रामपंचायत हद्दीतील मेडिकल समोर अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला.त्यास त्यांचा मित्र राजेशकुमार गौड यांनी उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले मात्र रस्त्यातच त्यांचे निधन झाले.उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांस मृत घोषित केले आहे.
उत्तरीय तपासणी नंतर त्याचे शव मयताचा पुतण्या विजयकुमार यादव यांचेकडे सोपविण्यात आले आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद २५/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.राजेंद्र म्हस्के हे करीत आहेत.