जाहिरात-9423439946
आरोग्य

कोरोना औषधा बाबत..यांनी मागितली मुख्यमंत्र्यांची भेट

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)कोरोना उपचारासाठी आयुर्वेदिक औषध उपलब्ध असल्याचा दावा करणारे कोपरगाव येथील अश्वमेध आयुर्वेदिक कंपनीचे संचालक तथा मुंबई विद्यापीठाचे शास्रज्ञ डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मागितली आहे.त्यासाठी त्यांची भेट घडविण्यासाठी शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख तथा कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे हे मदत करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

या आधीच डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांच्या कंपनीने मुंबई विद्यापीठातील जीव भौतिक शास्त्र विभागाशी सामंजस्य करार केला असून त्या विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ.प्रभाकर डोंगरे यांनी त्यांच्या उत्पादनाची शिफारस मुंबई कॉर्पोरेशन व राज्य कोविड टास्क फोर्स तसेच के.ई.एम.रुग्णालय यांच्या बरोबर संपर्क केलेला आहे.

कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असताना अद्याप या साथीवर उपचार सापडलेला नसताना कोपरगाव शहरातील प्रसिद्ध किडरोग तज्ज्ञ व आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी मात्र आपल्या कोपरगावस्थित अश्वमेध कंपनीकडे या विषाणूंचा बंदोबस्त करणासाठी कॅफेक्स हे जालीम आयुर्वेदीक औषध उपलब्ध असल्याचा दावा केला असून या औषधीने अनेक रुग्णांना गुण आल्याचे म्हटले आहे.तथापि शासकीय कसोटीवर त्याची तपासणी मात्र प्रलंबित आहे त्यामुळे त्यास शासन मान्यता मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे.त्या प्रयत्नाचा हा भाग असल्याची माहिती हाती आली आहे.भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ७०८ ने वाढून ती १ लाख ९१ हजार ३५६ इतकी झाली असून ५ हजार ४१३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ६७ हजार ६५५ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २ हजार २८६ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या १०८ वर जाऊन पोहचली आहे तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.दिल्ली,मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,संगमनेर हि कोरोनाची केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी पाचव्यांदा वाढवून ३० जून पर्यंत केली आहे.कोरोना बाधितांचे रोज नवेनवे उच्चान्क स्थापित होत आहे.जगात अद्याप पर्यंत अनेक देशांचे कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरु आहे.मात्र परिणामकारक लस शोधण्यात अद्याप कोणालाही यश मिळालेले नाही.या पार्श्वभूमीवर डॉ.वाघचौरे यांच्या दाव्याला महत्व प्राप्त झाले आहे.त्यांनी अनेक कोरोना बाधित पोलीसांना हे औषध दिल्याचा दावा केला असून या औषधानंतर त्यांचे अहवाल नकारात्मक आल्याचे सांगितले आहे.मात्र अद्याप राज्य पातळीवर त्यावर मंजुरीची मोहर उमटणे बाकी आहे.त्यामुळे त्यांनी आता राज्य व केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाकडे आपला प्रयत्न सुरु केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close