कोपरगाव तालुका
कोकमठाण हद्दीत अपघात,अज्ञात महिला ठार
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी सातच्या आतअज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक अज्ञात साठ वर्षीय महिला ठार झाली आहे.कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद आपल्या दप्तरी केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप तिकोणे हे करीत आहे.