जाहिरात-9423439946
कला व सांस्कृतिक विभाग

‘द केरल स्टोरी’ या चित्रपट…या गावात मोफत दाखवला

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटात ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या केरळमधील ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणी यांची कथा दाखवण्यात आली आहे.या चित्रपटाला विरोधही होत आहे.मात्र हा चित्रपट ३ मुलींच्या सत्यकथेवर आधारित असल्याचा दावा निर्मात्याकडून करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यातील लोणी येथे विश्व हिंदू परिषद,बजरंग दल शिर्डी यांच्या वतीने ‘नाथगंगा’ चित्रपट गृहात ३५० महिलांना मोफत दाखविण्यात आला आहे.या घटनेचे स्वागत होत आहे.

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटात ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या केरळमधील ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणी यांची कथा दाखवण्यात आली आहे.या चित्रपटाला विरोधही होत आहे.मात्र हा चित्रपट ३ मुलींच्या सत्यकथेवर आधारित असल्याचा दावा निर्मात्याकडून करण्यात येत आहे.देशाच्या राजकारणात सध्या ‘द केरळ स्टोरी’चा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला आहे.

दरम्यान एकीकडे पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने चित्रपटाला अजंडा म्हणत बंदी घातली आहे,तर दुसरीकडे काही राज्यांनीही चित्रपट करमुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे.अशा स्थितीत आता काही राज्यांमध्येही चित्रपट करमुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे,तर काही राज्यांमध्ये त्यावर बंदी घालण्याचीही मागणी होत आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला उत्तर प्रदेशमध्ये करमुक्त जाहीर केले असून याआधी मध्य प्रदेशातही चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.मात्र महाराष्ट्र राज्यात अद्याप वावर निर्णय झाला नसताना काही संघटना पुढाकार घेऊन मोफत दाखवत आहे.लोणी येथील ‘नाथगंगा’चित्रपट गृहात तो आज मोफत दाखवला आहे.

सदर प्रसंगी माजी जि.प.माजी अध्यक्षा शालिनी विखे,शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते,आदित्य वाणी,ज्ञानेश्वर वाडेकर,अविनाश धुमसे,किशोर कोते,साईदीप भालेराव,ओमकार घोडके,मयूर भोंडगे,साईश देसाई,प्रेम लोखंडे,पंकज जावळे,संकेत नाणेकर,साहेब मोहिते,अथर्व सूर्यवंशी,सुरेंद्र महाले,विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री शुभम मुर्तडक,बजरंग दल जिल्हा सहयोग बजरंग दलाचे प्रमुख कार्यकर्ते आदित्य वाणी,अविनाश धुमसे, बजरंग दल व विश्व हिदू परिषदचे सदस्य आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.त्यावेळी महिलांनीं समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close