जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या विमानतळ धावपट्टीवरील पाणी वळविण्याचे काम सुरु

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

काकडी विमानळाच्या धावपट्टीवरून वाहून जाणारे पाणी वळवून काकडी गावच्या शेतकऱ्यांना देण्यासाठी करण्यात येणाऱ्या भूमिगत जलवाहिणीचे व पाझर तलावाच्या खोदकामाचे भूमिपूजन नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले आहे.

माजी आ.अशोक काळे यांच्या कालखंडात जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या मार्गदर्शनाने काकडी विमानतळ समर्थक कृती समिती व काकडी ग्रामस्थ यांनी मोठे आंदोलन उभारले होते.त्यातून मोठा संघर्ष झाला होता.आधी अस्तगाव माथा,नंतर सावळीविहिर सोनेवाडी माथा,अंजनापूर-रांजणगाव देशमुख माथा,सायाळे-बहादरपूर माथा असा प्रवास करून हे विमानतळाचे चाक अखेर शेतकऱ्यांच्या आग्रहाने काकडी येथे टेकले होते.व २००९ साली शिर्डी विमानतळाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पार पडले होते.

माजी आ.अशोक काळे यांच्या कालखंडात जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या मार्गदर्शनाने काकडी विमानतळ समर्थक कृती समिती व काकडी ग्रामस्थ यांनी मोठे आंदोलन उभारले होते.त्यातून मोठा संघर्ष झाला होता.आधी अस्तगाव माथा,नंतर सावळीविहिर सोनेवाडी माथा,अंजनापूर-रांजणगाव देशमुख माथा,सायाळे-बहादरपूर माथा असा प्रवास करून हे विमानतळाचे चाक अखेर शेतकऱ्यांच्या आग्रहाने काकडी येथे टेकले होते.व २००९ साली शिर्डी विमानतळाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पार पडले होते.तेंव्हापासून ग्रामस्थांनी पायाभूत सेवा सुविधा व पिण्याचे पाणी आदी मागण्या केल्या होत्या व विमानतळ प्राधिकरणाने आधीच या मागण्या मंजूर केलेल्या होत्या मात्र अंमलबजावणी मात्र होत नव्हती.

यात परिसरातील शेतकऱ्यांनीं धावपट्टीवरून केलवड हद्दीत वाहून जाणारे पाणी काकडी ग्रामपंचायत हद्दीत मिळावे अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती.सन-२०१९ मध्ये विधानसभा निवडणूक संपन्न होऊन या निवडणुकीत आ. काळे यांना या भागातील नागरिकांनी मोठ्या माताधिक्क्याने निवडून दिले त्या नंतर त्यांनी मंत्रालय स्तरावर व विमानतळ प्राधिकरण यांच्याकडे पाठपुरावा करत होते. त्यांच्या या पाठपुराव्याला यश येऊन हे पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० लाख रुपये निधीतून भूमिगत पाईपलाईन व पाझर तलावाचे खोदकाम आजपासून सुरू करण्यात आले असून पुढील टप्प्यात आणखी तीन पाझर तलाव बनवण्यात येणार आहेत. आ.काळे यांनी हा प्रश्न मार्गी लावल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे,अॅड.राहुल रोहमारे,बाबासाहेब गुंजाळ,अनिल गुंजाळ,सहाय्यक कार्यकारी अभियंता कौस्तुभ ससाणे व शेतकरी सुरक्षित अंतर पाळून उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close