जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेने कोरोना (कोविंड १९) या साथींच्या विरोधात लढा सरकारला सहाय्य करण्यासाठी आपल्या निधीतून पंतप्रधान सहाय्यता निधीत १ लाख तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ७५ हजार रुपयांचा निधी जमा केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या संघटनेच्या वतीने यापूर्वी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पुढाकाराने पंतप्रधान सहायता निधी मध्ये एक लक्ष रुपये जमा करून योगदान दिलेले आहे.
महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणूची लागण होणाऱ्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.त्यामुळे या रुग्णांचा सरकारवर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपचाराचा भार वाढत चालला आहे.हि गंभीर बाब लक्षात घेऊन व सामाजिक जाणीवेतून यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र शासनास मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेच्या वतीने रुपये ७५ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

यासाठी महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अशोक दुधारे,कार्याध्यक्ष प्रकाश काटुळे,सरचिटणीस डॉ उदय डोंगरे,कोषाध्यक्ष राजकुमार सोमवंशी, दिलीप घोडके,निलेश बडजाते,प्रा संदेश भागवत,सुनील गोडळकर,शिवप्रसाद घोडके,आकाश लकारे,यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकारी मार्गदर्शक आदींनी पुढाकार घेतला आहे
सदर धनादेश निवासी जिल्हाधिकारी औरंगाबाद संजीव जाधवर यांच्याकडे राज्य तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर उदय डोंगरे यांनी सुपूर्द केला आहे. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी,क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे आदींची उपस्थिती होती.