जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

मीनाताई कुलकर्णी यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी) 

  कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा ब्राह्मण सभेचे माजी अध्यक्ष स्व.सुधाप्पा कुलकर्णी यांच्या धर्मपत्नी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन कुलकर्णी यांच्या मातोश्री मीनाताई सुधाकर कुलकर्णी (वय-८३वर्षे) यांचे नुकतेच निधन झाले आहे.

स्व.मीनाताई कुलकर्णी यांचे छायाचित्र.

स्व.मीनाताई या अत्यंत प्रेमळ,मनमिळाऊ व आदरातिथ्यशील स्वभावाच्या होत्या.कै.सुधाप्पा कुलकर्णी यांच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनातील कार्यात त्यांनी नेहमीच खंबीर साथ दिली होती.सुधाप्पांच्या घरी सामाजिक आणि सार्वजनिक कार्याच्या निमित्ताने अनेक बैठका होत असत.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

     स्व.मीनाताई या अत्यंत प्रेमळ,मनमिळाऊ व आदरातिथ्यशील स्वभावाच्या होत्या.कै.सुधाप्पा कुलकर्णी यांच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनातील कार्यात त्यांनी नेहमीच खंबीर साथ दिली होती.सुधाप्पांच्या घरी सामाजिक आणि सार्वजनिक कार्याच्या निमित्ताने अनेक बैठका होत असत.विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांची सतत ये-जा आणि उठबस असायची.या सर्वांचे मीनाताई नेहमीच हसतमुखाने स्वागत करून आपुलकीने आदरातिथ्य करीत असत.

   स्व.सुधाप्पांच्या सामाजिक कार्यामागे मीनाताईंचे मोलाचे सहकार्य आणि खंबीर पाठबळ होते.त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे व आपुलकीच्या वागण्यामुळे त्या सर्वांच्या परिचित होत्या.त्यांच्या निधनाने कुलकर्णी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून,कोपरगावच्या सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात मुलगी,मुलगा,सून,जावई,नातवंडे असा परिवार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close