आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दराची झाली बैठक !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील शेतकरी संघटनेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या “रास्ता रोको” आंदोलनानंतर आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झालेल्या बैठकीत साखर कारखानदारांनी पाठ फिरवली असून त्याबाबत शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त केला असून त्याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उद्या सायंकाळपर्यंत हा ऊसाचा दर जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे अहिल्या नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे या बैठकीकडे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान यावेळी जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व मुजोर कारखानदार तथा त्यांचे अध्यक्ष व त्यांचे उपस्थित राहिले नाहीत व त्यांनी देण्यात येणाऱ्या ऊसाचा दरही जाहीर केला नाही.यावेळी सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी किमान ४ हजार 500 रुपये ऊस दर देण्याची मागणी केली आहे.तर पालकमंत्र्यांनी उद्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कारखान्यांना देण्यात येणाऱ्या उचलीनंतर उद्या सायंकाळी ऊस दर जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.परंतु शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याला जोरदार विरोध केला असल्याचे दिसून आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला पहिली उचल ४ हजार रुपये प्रतिटन जाहीर राहुरी तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर मनमाड मार्गावर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी सुमारे तेरा तास “रास्ता रोको” आंदोलन केले होते.त्यानंतर रात्री 1.30 वाजता संपन्न झालेल्या बैठकीत सहकार अधिकारी सुनील खर्डे,अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे,तहसीलदार डॉ.अमित पवार आणि पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याबाबत मध्यस्थीचा प्रयत्न केला.मात्र,केवळ आश्वासनांवर आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.ऊसदर जाहीर करून मागण्यांबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय महामार्ग मोकळा करणार नाही,अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली होती.त्यामुळे प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ ठरले असताना रात्री एक वाजता यावर तोडगा निघाला होता.त्यात लेखी आश्वासनानंतर दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आणि साखर कारखानदार यांचे बैठकीनंतर निर्णय घेणार असल्याचे जाहीर केल्याने आंदोलन समाप्त केले होते.त्यामुळे आज संपन्न झालेल्या या बैठकीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागुन राहिले होते.

दरम्यान आज संपन्न झालेल्या या बैठकीत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे,संघटनेचे अनिल घनवट,सुरेश ताके,रवींद्र मोरे,दिलीप इंगळे,अभिजित पोटे,संजय पोटे,जिल्हाधिकारी,साखर सहसंचालक,पोलीस अधीक्षक व सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व मुजोर कारखानदार तथा त्यांचे अध्यक्ष व त्यांचे उपस्थित राहिले नाहीत व त्यांनी देण्यात येणाऱ्या ऊसाचा दरही जाहीर केला नाही.यावेळी सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी किमान ४ हजार 500 रुपये ऊस दर देण्याची मागणी केली आहे.तर पालकमंत्र्यांनी उद्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कारखान्यांना देण्यात येणाऱ्या उचलीनंतर उद्या सायंकाळी ऊस दर जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.परंतु शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याला जोरदार विरोध केला असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान त्यानंतर सर्व कारखानदार व पालकमंत्री,शासकीय अधिकारी निघून गेल्यानंतर त्याच सभागृहात सर्व संमतीने उद्या सायंकाळपर्यंत प्रशासनाला वेळ देण्याचे ठरले असल्याची माहिती ॲड.अजित काळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यावेळी त्यांनी उद्या संध्याकाळी जर अपेक्षित ऊस दर जाहीर केला नाही,तर सर्व साखर कारखान्याच्या गेटवर शेतकरी आंदोलन सुरू ठेवण्याचा व साखर कारखान्यात उत्पादित होणाऱ्या साखरेचे ट्रक अडवण्याचे आंदोलन तसेच नगर जिल्ह्यातुन जाणारे अहिल्यानगर मनमाड व अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्ग अडवणार असल्याचा निर्णय घेतला आहे.त्याबाबत शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले आहे.त्यामुळे हा ऊस उत्पादकांचा संघर्ष कोठवर चालणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.



