जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

तरुणाची आत्महत्या,अकस्मात मृत्यूची नोंद दाखल!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी) 

   कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत शारदानगर येथील रहिवासी असलेला आजची तरुण ऋत्विक सुभाष त्रिभुवन (वय – 23) याने रात्री 10 वाजे नंतर कधीतरी आणि सकाळी 10 वाजेच्या आत कधीतरी घरातील पंख्यास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.मयत तरुणच पश्चात आई,वडील आणि पत्नी असा परिवार आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मयत तरुण ऋत्विक त्रिभुवन यांचे छायाचित्र.

आजची तरुण पिढी मानसिक ताणतणाव,नैराश्य आणि भावनिक संघर्षाला मोठ्या प्रमाणावर सामोरी जात आहे.डिप्रेशन (नैराश्य),तीव्र चिंता आणि एकटेपणा यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.सोशल मीडियावरील आभासी जग,तिथे होणारी तुलना,सायबर बुलिंग आणि लाईक्स-कमेंट्स मिळवण्याची स्पर्धा मानसिक स्वास्थ्य बिघडवते.कौटुंबिक वाद,मित्रमैत्रिणींशी होणारे मतभेद किंवा प्रेमसंबंधांमधील अपयश तरुणांना सहन होत नाही.अमली पदार्थ किंवा दारूचे व्यसन तरुणांना मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवते,ज्यामुळे ते टोकाचे पाऊल उचलतात.यातून आत्महत्या घडत आहे.शारदानगर येथील घटना नेमकी कशामुळे घडली हे उघड झालेले नाही.

   तरुणांमधील वाढते आत्महत्येचे प्रमाण ही अत्यंत चिंताजनक आणि गंभीर सामाजिक समस्या बनली आहे.आजची तरुण पिढी मानसिक ताणतणाव,नैराश्य आणि भावनिक संघर्षाला मोठ्या प्रमाणावर सामोरी जात आहे.डिप्रेशन (नैराश्य),तीव्र चिंता आणि एकटेपणा यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.सोशल मीडियावरील आभासी जग,तिथे होणारी तुलना,सायबर बुलिंग आणि लाईक्स-कमेंट्स मिळवण्याची स्पर्धा मानसिक स्वास्थ्य बिघडवते.कौटुंबिक वाद,मित्रमैत्रिणींशी होणारे मतभेद किंवा प्रेमसंबंधांमधील अपयश तरुणांना सहन होत नाही.अमली पदार्थ किंवा दारूचे व्यसन तरुणांना मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवते,ज्यामुळे ते टोकाचे पाऊल उचलतात.कोपरगाव शारदा नगर येथील घटना नेमकी कशामुळे घडली आहे याचा उलगडा झालेला नाही.मात्र या तरुणाने जिवनात आलेल्या नैराश्यात आपली जीवनयात्रा संपवली असल्याचे उघड झाले आहे.तो मूळ वैजापूर तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याचे आई,वडील आणि तो रोजंदारी करून आपली उपजीविका चालवत होता.त्यांच्यावर वैजापूर तालुक्यात शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला आहे.

   या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू दप्तरात नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव  डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल बबन तमनर हे करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close