निधन वार्ता
जितेंद्र नेने यांना पितृशोक !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव ब्राह्मण सभेचे संस्थापक व माजी अध्यक्ष जितेंद्र नेने यांचे पिताश्री प्रभाकर नेने (वय -92 वर्षे) यांचे आज सकाळी पुणे येथील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा नातवडे असा परिवार आहे.त्यांच्यावर पुणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

कै.प्रभाकर नेने हे कोपरगाव येथील प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित होते.त्यांनी ब्राह्मण सभेच्या स्थापनेपासून जडणघडणीत मोलाचे योगदान दिले होते.समाजातील बांधवांना एकत्र आणणे,समाजहिताच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि संस्थेच्या कार्याला भक्कम आधार देणे यामध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा.ब्राह्मण सभेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन,सर्वांच्या विचारांचा आदर राखत संस्थेचा कारभार सांभाळला.त्यांच्या कार्यपद्धतीत समन्वय,सामंजस्य आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती दिसून येत असे.त्यांचा स्वभाव अतिशय शांत,संयमी,प्रेमळ आणि मनमिळाऊ होता.सुरुवातीच्या काळात त्यांनी केलेले शेतीविषयक कार्य आणि त्यासाठी घेतलेले कष्टही निश्चितच स्मरणात राहण्यासारखे आहेत. कष्ट,प्रामाणिकपणा आणि साधेपणा यांचा सुंदर संगम त्यांच्या जीवनात पाहायला मिळत होता.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



