जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

ऐन दिवाळी उत्सवात गोवंश हत्या,गुन्हा दाखल !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी) 
 
   राज्यात गोवश जातीच्या प्राण्याची कत्तल करण्यास मनाई असताना व तसा कायदा असताना कोपरगाव शहर आणि परिसरात सातत्याने या घटनेची पुनरावृत्ती होताना दिसून येत आहे.आज पहाटे 2.15 वाजेच्या सुमारास अशीच घटना उघडकीस आली असून यातील एक चार चाकी मारुती स्विफ्ट गाडी (क्रमांक एम.एच.04 एफ.एफ.7325) हि गोमांस घेऊन जाताना आढळून आल्याने पोलिसांनी जप्त करून अज्ञात चालक आणि मालकाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहरातील संजयनगर आणि खडकी नाका यांसारख्या संवेदनशील भागांमध्ये अवैध गोवंश कत्तलखान्यांच्या विरोधात पालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून अनेक बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त केली आहेत.तरीही काही परिणाम साधताना दिसून येत नाही.आज पहाटे 2.15 वाजता कोपरगाव शहर पोलिसांना गुप्त खबर मिळाल्यावर त्यांनी पुणतांबा फाटा या ठिकाणी सापळा लावला असता त्या ठिकाणी त्यांना मध्यरात्रीच्या सुमारास एक वरील क्रमांकाची मारुती स्विफ्ट कार गाडी (क्रमांक एम.एच.04 एफ.एफ.7325) मध्ये गोवंश जनावराची कत्तल करुन गो मांस विक्री करण्याचे उददेशाने जवळ बाळगुन त्याची वाहतुक करताना मिळून आले आहे.

   कोपरगाव तालुक्यात अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तलखान्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक व गोप्रेमींमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही महिन्यांत स्थानिक प्रशासन,पोलीस आणि गोरक्षक यांच्या सतर्कतेमुळे अनेक कारवाया करण्यात आल्या असून,मोठ्या प्रमाणात गोवंशाची सुटका करण्यात आली आहे.नोव्हेंबर २०२६ च्या सुरुवातीलाच कोपरगाव तालुका पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने एकाच वेळी ४ वाहनांवर (पिकअप आणि छोटा हत्ती) धाड टाकून १३ गोवंश जनावरांची निर्दयी वाहतुकीतून सुटका केली.या कारवाईत ७.६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कोपरगाव शहरातील संजयनगर आणि खडकी नाका यांसारख्या संवेदनशील भागांमध्ये अवैध गोवंश कत्तलखान्यांच्या विरोधात पालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून अनेक बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त केली आहेत.तरीही काही परिणाम साधताना दिसून येत नाही.आज पहाटे 2.15 वाजता कोपरगाव शहर पोलिसांना गुप्त खबर मिळाल्यावर त्यांनी पुणतांबा फाटा या ठिकाणी सापळा लावला असता त्या ठिकाणी त्यांना मध्यरात्रीच्या सुमारास एक वरील क्रमांकाची मारुती स्विफ्ट कार गाडी (क्रमांक एम.एच.04 एफ.एफ.7325) मध्ये गोवंश जनावराची कत्तल करुन गो मांस विक्री करण्याचे उददेशाने जवळ बाळगुन त्याची वाहतुक करताना मिळून आले आहे.त्यामध्ये एकूण 600 किलोग्रॅम गोवंश जातीचे मांस 300 रूपये प्रती किलो प्रमाणे,5,लाख रुपये किमतीची चारचाकी स्विफट गाडी असा अंदाजे एकूण 6 लाख 80हजार रुपये किमतीचा गोवंशं माल जप्त केला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत बाळु कु-हाडे यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती हाती आली आहे.

  या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रमांक 650/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 325,सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5,5 क, 5 ब,9,9 अ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल श्री.सोनवणे हे करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close