गुन्हे विषयक
व्यापाऱ्यांकडून अपंगास शिवीगाळ,गुन्हा दाखल!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर आणि तालुक्यात दीपावली सण उत्साहात संपन्न होत असताना अपंग इसम अकबर शेखलाल शेख (वय -60वर्षे) यांनी घेतलेला बल्ब बदलून आणण्यासाठी गेले असता त्यांना कोपरगाव गुरुद्वारा रोड,वाणी कॉम्प्लेक्स येथील राजपाल इलेक्ट्रॉनिक्सचे व्यापारी (नाव माहिती नाही) यांनी शिवीगाळ करून अपंग असताना त्यांना मारण्यास धावून आले असून अपमानास्पद वागणूक दिल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असल्याची घटना उघडकीस आली आहे.

आपण एल.ई.डी.बल्ब बदलून घेण्यासाठी कोपरगाव शहरातील,’राजपाल इलेक्ट्रॉनिक्स’ या दुकानात गेलो असता त्यांनी आपल्याला,”माझे मुलाने तुम्हाला बल्ब चालु करुन दाखविला होता आता तुम्ही बंद बल्ब घेवुन आले तुम्हाला बल्ब बदलुन देणार नाही” असे म्हणुन त्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.मी त्यांना,”तुम्ही,शिवीगाळ का करता ? असे म्हणाल्याने त्यांनी मला,” तुम्ही कोण लागुन गेले,मी तुम्हाला ओळखत नाही,तुम्हाला कोठे जायचे तेथे जा,मी कोणाला घाबरत नाही” असे म्हणुन दमदाटी केली.मी त्यास म्हणालो,”मी दिव्यांग आहे,मला चालता येत नाही तरी देखिल तुम्ही मला वर खाली करायला लावत आहात” असे म्हणाल्याने त्याने माझी अपंगत्वाची चेष्टा करुन,” मी पण बहिरा आहे,मला ऐकायला येत नाही”असे म्हणुन आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली असल्याचे म्हटले आहे.
अपंग (दिव्यांग) व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबीपणे जगण्यासाठी आपल्या समाजाच्या,शासनाच्या आणि वैयक्तिक पातळीवर सक्रिय सहकार्याची अत्यंत गरज आहे.दिव्यांग व्यक्ती केवळ सहानुभूतीची नाही,तर समान संधी आणि आदराची अपेक्षा करतात.त्यांना जगण्यास सहाय्यभूत होण्यासाठी खालील क्षेत्रांमध्ये सहकार्य मिळणे आवश्यक आहे.दिव्यांगांकडे ‘बिचारे’ म्हणून न पाहता,त्यांच्यातील क्षमतेचा आदर केला पाहिजे.समाजमाध्यमे,कौटुंबिक कार्यक्रम आणि कामाच्या ठिकाणी त्यांना समान दर्जा दिला गेला पाहिजे.दिव्यांगांना सहकार्य करणे म्हणजे त्यांच्यावर उपकार करणे नव्हे,तर त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणे आहे.जेव्हा समाज संवेदनशील होईल,तेव्हाच दिव्यांग व्यक्ती खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात सामील होऊन स्वाभिमानाने जगू शकतील.असे असताना कोपरगाव शहरातून नेमकी याच्या विरुद्ध कृती घडली असल्याचे उघड झालं आहे.यातील अपंग व्यापारी अकबर शेख हे खंदकनाला येथील रहिवासी असून ते आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी हातगाडीवर कपडे विकरण्याचा व्यवसाय करतात.त्यांनी काल दिनांक 05 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता गुरुव्दारा रोड, वाणी कॉम्प्लेक्स,राजपाल इलेक्ट्रॉनिक्स येथून एक एल.ई.डी.बल्ब खरेदी केला होता.तो घेऊन ते घरी गेले व त्यांनी तो आपल्या घरात लावून पाहिला असता तो बंद निघाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.त्यांनी तातडीने संबंधित दुकानात जाऊन तो बदलून देण्याची मागणी दुकानदाराचे मुलाकडे केली होती.त्याचे त्याने मी तो बदलून देऊ शकत नाही.खाली वडिलांकडे जावे लागेल असे सांगितले.मात्र आपण अपंग असून आपल्याला खालीवर जाणे अवघड असल्याची बाब त्यांचे लक्षात आणून दिली असता त्यांनी तरीही वडिलाना भेटण्यास सांगितले.आपण नाईलाजानं त्यांना भेटण्यास गेलो असता त्यांनी मला,”माझे मुलाने तुम्हाला बल्ब चालु करुन दाखविला होता आता तुम्ही बंद बल्ब घेवुन आले तुम्हाला बल्ब बदलुन देणार नाही” असे म्हणुन त्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.मी त्यांना,” तुम्ही,शिवीगाळ का करता ? असे म्हणाल्याने त्यांनी मला,” तुम्ही कोण लागुन गेले,मी तुम्हाला ओळखत नाही,तुम्हाला कोठे जायचे तेथे जा,मी कोणाला घाबरत नाही” असे म्हणुन दमदाटी केली.मी त्यास म्हणालो,”मी दिव्यांग आहे,मला चालता येत नाही तरी देखिल तुम्ही मला वर खाली करायला लावत आहात” असे म्हणाल्याने त्याने माझी अपंगत्वाची चेष्टा करुन,” मी पण बहिरा आहे,मला ऐकायला येत नाही” असे म्हणुन काही आक्षेपार्ह अपशब्द वापरले.तसेच मला,”तुला बायको निट संभाळत नसेल म्हणुन तु वेडया सारखे करतो” दिव्यांग म्हणुन तुम्ही माझेवर उपकार करता का ? तुमचे सारखे किती येतात किती जातात मी कोणालाही घाबरत नाही”असे म्हणुन मला अपनास्पद वागणुक देऊन आपल्याला मारण्यासाठी धावुन आले असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 चे कलम 92 अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करत आहेत.



