जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पहिल्याच जनसंवाद कार्यक्रमात प्रश्नांचा महापूर…!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे) 

  जलसंपदा विभागात प्रतिवर्षी कालवे आणि चाऱ्याचे देखभाल दुरुस्तीवर नेमका किती खर्च होतो.आणि प्रत्यक्षात किती कामे झाली आहेत याचा आपल्याला आगामी तीन महिन्यानंतरच्या होणाऱ्या जनसंवाद कार्यक्रमात अधिकाऱ्यांना द्या लागेल असा सज्जड इशारा विधानपरिषदेचे आ.विवेक कोल्हे यांनी आज संपन्न झालेल्या पहिल्याच जनसंवाद कार्यक्रमात बोलताना दिला आहे.त्यामुळे जलसंपदा अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचे मानले जात आहे.

पहिल्याच जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेताना आ.विवेक कोल्हे आणि अधिकारी दिसत आहेत.

दरम्यान या पहिल्याच जनसंवाद कार्यक्रमात कोल्हे समर्थक कार्यकर्त्यांनी सात वर्षांनी पहिल्यांदा संधी मिळाल्याने मोठी गर्दी केली असल्याचे दिसून आले आहे.त्याबाबत सत्ताधारी वर्गाच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या तक्रारी असल्याचे दिसून आले आहे.मात्र हा इतका मोठा जनसंवाद माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या नंतर पहिल्यांदा पाहायला मिळाला असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.



   आगामी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारात आज दि.५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता आ.विवेक कोल्हे यांचच्या पहिलाच लोकसंवाद उपक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.त्यावेळी महसूल,पोलिस,जलसंपदा,भूमी अभिलेख विभाग आणि प्रशासनाच्या विरुद्ध सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या असल्याचे दिसून आले आहे.त्यावेळी गोदावरी कालव्याचे लाभक्षेत्रात चाऱ्याची दुरुस्तीची कामे होताना दिसून येत नाही अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले होते या पार्श्वभूमीवर त्यांनी हा आदेश दिला आहे.

जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांची मोठी उपस्थिती दिसत आहे.

यावेळी गोधेगाव येथील बँक अधिकाऱ्यांनी मयत व्यक्तींचे नावावरील हजारो रुपयांच्या रकमा काढल्याचा गंभीर आरोप गोधेगावचे माजी सरपंच अशोक भोकरे यांनी केला आहे.त्यावर आ.कोल्हे यांनी आजच त्यांचे खात्यावर व्याजासह रक्कम जमा होईल व त्यांना निलंबित करू असे आश्वासन दिले आहे.त्यामुळे हा मुद्दा दोन दिवसापूर्वी संपलेल्या जिल्हा निवडणुकीत का उपस्थित झाला नाही असा सवाल उपस्थित झाला आहे.भोकरे यांनी तोंड का बंद केले होते ? त्यामागे काय गौडबंगाल आहे याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहे.

  सदर प्रसंगी कोपरगाव तहसीलदार महेश सावंत,नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान,मुख्याधिकारी अजित निकत,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्नील वाळुंज,सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप दळवी,कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे,तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड,वन विभागाचे अधिकारी मेहमूब शेख,गोदावरी कालवे उपविभागाचे उपअभियंता संदीप पाटील,राहाता उपविभागाचे उपअभियंता विवेक लव्हाट,तालुका पशुसंवर्धन अधिकारी श्रद्धा काटे,लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस.आर.दळवी,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,संजीवनीचे उपाध्यक्ष द्यानेश्वर परजणे,जिल्हा परिषद माजी गटनेते केशव भवर,माजी सभापती मच्छिंद्र टेकें,शिवाजी वक्ते,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शरद थोरात, येसगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बापूसाहेब सुराळकर आदीसह मोठ्या संख्येने नागरिक आणि कोल्हे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान कोपरगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी चोरी नव्हे दरोडा पडूनही त्यातील आरोपींना पकडले जात नाही आणि मुद्दमाल जप्त होत नसल्याच्या तक्रारी महिल्यांनी केल्या असून याबाबत पोलिसा अधिकाऱ्यांची आ.विवेक कोल्हे यांनी झाडाझडती घेतली असल्याचे दिसून आले आहे.

महसूल,वीज,पाणी टंचाई,जलसंपदा आदी प्रश्न आधी घ्यायला हवे असताना ते उशिरा घेतल्याने त्या प्रश्नांचे गांभीर्य कमी झाले असल्याचे दिसून आले आहे.त्याबाबत कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके,जिल्हा परिषदेचे माजी गटनेते केशव भवर आदींनी वारंवार विनंती करूनही शेती सिंचन,पाणी टंचाई,वीज प्रश्न,महसूल प्रश्न आदींना आधी वेळ द्यावा अशी मागणी करूनही हे मी महत्वाचे प्रश्न उशिराने घेतल्याने ही आधीचीच रणनीती असल्याचे नागरिकांत बोलले जात असून जनसंवाद कार्यक्रमाचा इस्कोट व्हायला नको याशी काळजी घेतली असल्याचे नागरिकांत बोलले जात होते.

   यावेळी जलसंपदा विभागाच्या शेती सिंचनाच्या आवर्तनाचा प्रश्न ज्वलंत बनला असल्याचे दिसून आले आहे.प्रत्येक जुलै मध्ये गोदावरीच्या पश्चिम घाटमाथ्यावर पाऊस नक्की पडत असताना पिण्याचे ४० टक्के आरक्षण का केले जात आहे.गोदावरी कालव्यांचे आवर्तन १ डिसेंबर रोजी का केले असा सवाल माजी सभापती मच्छिंद्र टेकें यांनी केला आहे.हे आवर्तन १५ नोव्हेंबर रोजीच द्यावे असे आवाहन टेके यांनी केले आहे.यावेळी पढेगाव सेक्शन मध्ये ११ नंबर चारी व अन्य बऱ्याच चाऱ्यांना पाणी सोडण्यासाठी फाटक नसल्याचा आरोप भोजडे येथील कार्यकर्ते दत्तात्रय सिनगर यांनी आणि अन्य शेतकऱ्यांनी केला आहे.डाव्या कालव्यावर ७० लाखांचा देखभाल खर्च केल्याचे उघड झाले असताना हा खर्च कोठे आहे.यावर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.यावेळी २० नोव्हेंबर रोजी आवर्तन सोडणार असल्याचे कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी दिली असल्याची माहिती आ.कोल्हे यांनी दिली आहे.बिगर सिंचन २९ सप्टेंबर रोजी दिले होते.त्यामुळे उशीर झालेला आहे.म्हणजे ०१ डिसेंबर रोजी आवर्तन देणार असल्याचे उघड झाले आहे.

आज आयोजित जनसंवाद कार्यक्रमात तक्रारीचा पाढा वाचताना नागरिकांनी केलेली गर्दी दिसत आहे.

दरम्यान जनसंवाद कार्यक्रमात संपत आला असताना अखेरच्या टप्यात सहकार  महर्षि कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी कोपरगाव पंचायत समितीला सोळा वर्षात पहिल्यांदा तालुका शिक्षण अधिकारी पी.जे.वाजे मिळाल्या असताना त्यांना त्यांच्या केबिन मध्ये बसु दिले जात नसल्याचा आरोप केला आहे.त्यावर आ.विवेक कोल्हे यांनी,”कोपरगाव पंचायत समितीत तालुका शिक्षण अधिकारी मिळत नसताना आपण त्यांना मोठ्या कष्टाने आणले आहे.त्याबाबत आ.कोल्हे यांनी मोठे आकांडतांडव केले असल्याचे दिसून आले आहे.दरम्यान यांनी याबाबत कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्नील वाळुंज यांची चांगलीच कान उघडणी केली व आपण मोठ्या प्रयत्नाने अधिकारी आणतो आणि तुम्ही त्यांना न्याय देत नाही का ? असा जाबसाल केला असल्याचे दिसून आले आहे.

   दरम्यान पाणी वापर सहकारी संस्था सहकार विभागाने स्थापन केल्या मात्र आता ते जबाबदार नाही मग याला वाली कोण असा सवाल दत्तात्रय सूर्यभान सिंनगर यांनी केली आहे.याबाबत सहकार अधिकारी आ.कोल्हे यांनी स्वतंत्र बैठक लावण्याचे आवाहन केले आहे.

  यावेळी प्रशांत कडू यांनी कोपरगाव शहराला पाणी कधी देणार याच्या तारखा आधी जाहीर करा अशी मागणी केली आहे.आधीच सहा दिवसाआड पाणी सुरू आहे.यावेळी जलसंपदा विभागाचे उपअभियंता पाटील यांनी आगामी आठ दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासित केले आहे.यावेळी उजव्या काळ्याचे आवर्तन २० नोव्हेंबर रोजी सोडणार असल्याचे आश्वासन विवेक लव्हाट यांनी दिले आहे.उजव्या कालव्यावर ६०-७० लाख खर्च केला असल्याचे मोघम सांगितले आहे.उजव्या कालव्याला पुढे पाणी जात नसल्याने मागील चाऱ्यांना पाणी सोडावे लागत असल्याचा आरोप सहकार महर्षि कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी गटनेते केशव भवर यांनी केला आहे.त्यावेळी शेतकऱ्यांनी ०७ नंबर अर्ज भरावे असे आवाहन आ.कोल्हे यांनी केले आहे.दरम्यान यावेळी संजीवनीचे संचालक बाळासाहेब वक्ते यांनी गोदावरी कालव्यांचे आवर्तन येत्या १५ नोव्हेंबर रोजी द्यावे तरच चारा पिके आणि रब्बी पिके करता येतील असे आवाहन केले आहे.३० कि.मी.कालव्यांचे काम कलवट असल्याचे सांगतात.अधिकारी सापत्नपणा करतात असा आरोप केला आहे.एस्केप पद्धतीमुळे वाढीव पाणी बंधाऱ्यात सोडून भूजल वाढवण्याचे काम करावे अशी मागणी केली आहे.अकरा क्रमांकाच्या चारीला अधिकारी जाणीवपूर्वक पाणी सोडत नसल्याचे आरोप केले आहे.

जनसंवाद कार्यक्रमात बोलताना पांडुरंग शिंदे हे जेष्ठ कार्यकर्ते दिसत आहेत.

दरम्यान महसूल,वीज,पाणी टंचाई,जलसंपदा आदी प्रश्न आधी घ्यायला हवे असताना ते उशिरा घेतल्याने त्या प्रश्नांचे गांभीर्य कमी झाले असल्याचे दिसून आले आहे.त्याबाबत कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके,जिल्हा परिषदेचे माजी गटनेते केशव भवर आदींनी वारंवार विनंती करूनही शेती सिंचन,पाणी टंचाई,वीज प्रश्न,महसूल प्रश्न आदींना आधी वेळ द्यावा अशी मागणी करूनही हे मी महत्वाचे प्रश्न उशिराने घेतल्याने ही आधीचीच रणनीती असल्याचे नागरिकांत बोलले जात असून जनसंवाद कार्यक्रमाचा इस्कोट व्हायला नको याशी काळजी घेतली असल्याचे नागरिकांत बोलले जात होते.

   यावेळी निळवंडे धरणाच्या तारखा डिसेंबर मध्ये दिल्या आहेत.बहादरपूर,बहादराबाद,शहापूर,जवळके आदी गावांना अद्याप पाणी मिळालेले नाही.खोकड विहीर,सटूबाई मळा या ठिकाणी व्हॉल्व बसवा अशी मागणी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष कैलास रहाणे,मयुर कांडेकर यांनी केली आहे.याबाबत स्वतंत्र बैठक आयोजित केली जाणार असल्याची घोषणा आ.विवेक कोल्हे यांनी केली आहे.
 

   दरम्यान यावेळी कोपरगाव नगरपरिषदेच्या पाच क्रमांकाचा साठवण तलाव होऊनही आजही सहा दिवसांनी पाणी पुरवठा का होत आहे असा सवाल कार्यकर्ते विजय आढाव यांनी केला आहे.यावेळी वीज प्रश्नावर केशव भवर यांनी पिके जळत असल्याचा आरोप केला आहे.वीज प्रश्न अत्यंत वाईट आहे.स्मार्ट मीटर महाग पडत आहे आणि ते चुकीचे आहे.ग्राहकांचे शंका निरसन होईपर्यंत दोन्ही मिटर ठेवा असे आवाहन आ.कोल्हे यांनी केले आहे.यावेळी महावितरण विरुद्ध शेतकऱ्यांचा मोठा रोष दिसून आला आहे.येसगावचे राष्ट्रपती पुरस्कार विजेते माजी सरपंच बापुसाहेब सुराळकर यांना तीन किलो वॅट सोलर प्रकल्प असताना त्याचे वीजबिल ३६ हजार असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  यावेळी प्रारंभी शेती महामंडळाच्या कचेश्वर गोविंद आहेर यांच्या हनुमानवाडी येथील शेती महामंडळाची जागा अधिवासाठी मिळावी या जागेच्या प्रश्नापासून सुरुवात केली होती.तिळवणी येथील बाजार समितीच्या वजनकाट्यात लूटमार होत आल्याचा आरोप केला आहे.त्यावेळी सचिव नानासाहेब रणशुर यांनी एक ते दिड महिन्यात बाजार समिती वजनकाट्याची सुविधा करील असे आश्वासन दिले आहे.त्यावेळी आ.कोल्हे यांनी एक महिन्यात करावे अशा सूचना दिली आहे.यावेळी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाटपाणी आणि टंचाई या विषयावर ही बैठक घ्यावी अशी सूचना केली आहे.

  यावेळी पूर्वी रात्री चोरी होत होत्या आता त्या दिवसा होत असल्याचा नागरिकांनी आरोप हांडेवाडी येथील चोरी प्रकरणावरून केला आहे.महिलांकडून प्रति महिला ०५ हजार ८०० रुपये घेऊन पिठाची गिरणी देऊ असे आमिष दाखवून जवळपास ५०-६० हजारांची एक वर्षापूर्वी फसवणूक केली असल्याचा आरोप कोकमठाण येथील महिलांनी केली आहे.त्यावर संभाजी गायकवाड यांनी कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे.लासलगाव येथे या आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहे.यात दोन आरोपी असून पोलिस अधीक्षांची परवानगी घेऊन गुन्हे दाखल करू असे आश्वासन पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी दिले आहे.

   यावेळी समृद्धीवर चोऱ्या आणि लूट होत आल्याबाबत तक्रार कच्ची यांनी केली आहे. डिझल चोरीबाबत पोलिस कारवाई करत नाही असा आरोपही वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आयूब कच्छी यांनी केला आहे.यावेळी गायकवाड यांनी दहा आरोपी अटक केले असल्याचा खुलासा केला आहे.

  संजय गांधी निराधार योजनेच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर असल्याचे महिलांच्या तक्रारीवरून दिसून आले आहे.अर्ज देऊन अनेक महिने उलटूनही कार्यवाही होत नाही ही गंभीर बाब उघड झाले आहे.सहा महिन्यापासून कोणतीच कार्यवाही झालेली दिसून आली नाही याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.त्यावेळी आपण यात लक्ष घालून ही कामे मार्गी लावू असे आश्वासन आ.कोल्हे यांनी दिले आहे.

  दरम्यान वन विभागाच्या जवळके,मनेगांव,येसगाव बहादरपूर आदी ठिकाणी बिबट्या आढळून येत असल्याच्या तक्रारी असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यावर आ.कोल्हे यांनी आमच्या वस्तीवर बिबट्या असून त्याचा बंदोबस्त करा अशी मागणी केली आहे.वन विभागाचे एकूण ४२ पिंजरे असून त्याची कार्यवाही सुरू आहे.आपण तोंडी सूचनांवर सुद्धा पिंजरे लावत असल्याचा दावा केला आहे.वन विभागाच्या जमिनीतून अवैध उत्खनन होत असल्याच्या तक्रारी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर आल्या असल्याचे दिसून आले आहे.संवत्सर येथील ४२ एकर जमिनीची नोंदच नसल्याबाबत वन अधिकाऱ्यांनी दावा केला आहे.त्यावर संवत्सर येथील ग्रामस्थानी मोठा आक्षेप घेतला आहे.

  दरम्यान कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील कार्यकर्ते गोरक्षनाथ विनायक रहाणे यांनी बहादरपूर येथील भूमिगत गटारीच्या मधून पाणी निचरा होत नसल्याची तक्रारी आल्या त्यातून पाणी जात नसल्याची बाब लक्षात आणून दिली असून या प्रकरणाची चौकशीची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.असून त्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी यांना विचारणा केली असता अद्याप त्याचे एम.बी.आणि बिल दिले नसल्याचा खुलासा केला आहे.यावेळी पिक विम्याबाबत रहाणे यांनी विचारणा केली आहे.त्याचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे.

  यावेळी सहकार विभागाबाबत खूप तक्रारी तालुक्यात खूप सहकारी संस्था आहे.त्याबाबत नागरिक जागरूक असून त्याबाबत जाहीर बोलणे योग्य नाही.मात्र अप्रत्यक्ष सहकार अधिकाऱ्यांची कमी बोलून कान उघडणी केली असल्याचे दिसून आले होते.शिवाय आगामी काळात या सहकार विभागाने आपल्या चुका दुरुस्त करून घ्या असे आवाहन आ.कोल्हे यांनी केले आहे.

  तर यावेळी मनसेचे शहर प्रमुख अनिल काकडे यांनी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी चौदा वर्षापूर्वी विस्थापित नागरिकांना पर्यायी जागेत खोका शॉप देण्याचे आश्वासन दिले ते पाळले नसल्याचा आरोप केला आहे.व आपण ते देणार आहे का असा नेमका सवाल केला आहे.व जून विस्थापितांचे भूत बाटलीतून काढले असल्याचे दिसून आले आहे.

  सदर प्रसंगी प्रास्तविक तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे तर स्वागत माजी उपसरपंच दिपक चौधरी यांनी केले आहे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी केले आहे तर आभार   यांनी मानले आहे.

  यावेळी गोधेगाव येथील बँक अधिकाऱ्यांनी मयत व्यक्तींचे नावावरील हजारो रुपयांच्या रकमा काढल्याचा गंभीर आरोप गोधेगावचे माजी सरपंच अशोक भोकरे यांनी केला आहे.त्यावर आ.कोल्हे यांनी आजच त्यांचे खात्यावर व्याजासह रक्कम जमा होईल व त्यांना निलंबित करू असे आश्वासन दिले आहे.त्यामुळे हा मुद्दा दोन दिवसापूर्वी संपलेल्या जिल्हा निवडणुकीत का उपस्थित झाला नाही असा सवाल उपस्थित झाला आहे.भोकरे यांनी तोंड का बंद केले होते ? त्यामागे काय गौडबंगाल आहे याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहे.

  दरम्यान जनसंवाद कार्यक्रमात संपत आला असताना अखेरच्या टप्यात सहकार  महर्षि कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी कोपरगाव पंचायत समितीला सोळा वर्षात पहिल्यांदा तालुका शिक्षण अधिकारी पी.जे.वाजे मिळाल्या असताना त्यांना त्यांच्या केबिन मध्ये बसु दिले जात नसल्याचा आरोप केला आहे.त्यावर आ.विवेक कोल्हे यांनी,”कोपरगाव पंचायत समितीत तालुका शिक्षण अधिकारी मिळत नसताना आपण त्यांना मोठ्या कष्टाने आणले आहे.त्याबाबत आ.कोल्हे यांनी मोठे आकांडतांडव केले असल्याचे दिसून आले आहे.दरम्यान यांनी याबाबत कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्नील वाळुंज यांची चांगलीच कान उघडणी केली व आपण मोठ्या प्रयत्नाने अधिकारी आणतो आणि तुम्ही त्यांना न्याय देत नाही का ? असा जाबसाल केला असल्याचे दिसून आले आहे.मात्र त्याच वेळी त्यांची हतबलता लपवत असल्याचे दिसून येत होते.

  यावेळी कार्यकर्ते मधुकर साबळे यांनी संवत्सर भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणी करूनही ती अधिकृत असल्याचे सांगतात त्यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.त्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले आहे.त्यावर अधिकारी काय करतात असा सवाल आ.कोल्हे यांनी केला आहे.

  सदर प्रसंगी प्रास्ताविकात तहसीलदार महेश सावंत यांनी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे ऐवजी माजी खा.स्व.शंकरराव काळे यांनाच आदरांजली वाहिली ही चूक नागरिकांनी लक्षात आणून दिल्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यावेळी आ.विवेक कोल्हे यांनी आपण विधानपरिषदेचे आमदार झालो हे सांगण्यासाठी आणि अधिकारी आणि लोकांना माहिती होण्यासाठी हा लोकसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगून बाजू सावरून नेली असल्याचे दिसून आले आहे.यावेळी त्यांनी ६०२ तक्रारी उपस्थित झाल्या आहेत.यातील निम्म्या वैयक्तिक तक्रारी दाखल असल्याचे सांगून यातील बऱ्याच तक्रारी जागेवर सोडवण्याच्या प्रयत्न आहे.त्यावेळी लोक म्हणतात की,”तालुक्याला दोन आमदारांच्या मुळे डबल इंजिन निर्माण झाले असल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.मात्र इंजिनाच्या मागील डबे (प्रशासन) जुनेच असल्याचे सांगून विकासाला तो मोठा अडथळा असल्याचे सुतोवाच केले असल्याचे मानले जात आहे.

  सदर प्रसंगी प्रास्तविक तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे तर स्वागत माजी उपसरपंच दिपक चौधरी यांनी केले आहे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी केले आहे तर आभार गटविकास अधिकारी स्वप्नील वाळुंज यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close