क्रीडा विभाग
तलवारबाजी स्पर्धेत…या तरुणाचे मोठे यश !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय व अहिल्यानगर येथील जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच १४,१७ व १९ वर्षे वयोगटातील मुलांची पुणे विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून या स्पर्धेत के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आयुष पोकळे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

दरम्यान त्याची निवड सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी झाली आहे.त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,विश्वस्त संदीप रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी आदीसह सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे,उपप्राचार्य प्रा.बाळासाहेब सोनवणे,माजी प्रशिक्षक दिलीप घोडके सर आदींनी अभिनंदन केले आहे.



