जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

शहरातील अतिक्रमण नियमित करण्याचे…यांचे आवाहन!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या २५ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार,कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील शासकीय जमिनीवरील पात्र निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत,असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी केले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान.

 

    कोपरगाव नगरपरिषद निवडणुकी दरम्यान राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचारसभेत नगरपरिषद हद्दीतील पात्र निवासी अतिक्रमणे नियमित करून नागरिकांना त्यांच्या हक्काचे उतारे देण्याचे आश्वासन दिले होते.त्यानुसार पात्र निवासी अतिक्रमणे शासनाच्या नियमानुसार नियमित करण्याची प्रक्रिया पुढे नेली जात असल्याचा दावा केला आहे.पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून या प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्ष पराग संधान यांनी केले आहे.

   यासंदर्भात सोमवार,दि.१९ ऑक्टोबर २०२६ रोजी कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्ष पराग संधान,मुख्याधिकारी अजित निकत,संतोष भट्टड आणि सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत बैठक झाली.या बैठकीत १ जानेवारी २०११ रोजी किंवा त्यापूर्वी अस्तित्वात असलेली पात्र निवासी अतिक्रमणे शासनाच्या निर्धारित अटी व शर्तींनुसार नियमित करण्याबाबत चर्चा करण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.यात अतिक्रमण नियमित करण्यासाठी नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज संपूर्ण माहितीसह भरून सादर करावा.अर्जासोबत आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यापैकी एका कागदपत्राची छायांकित प्रत,अतिक्रमण १ जानेवारी २०११ रोजी किंवा त्यापूर्वी अस्तित्वात असल्याचे पुरावे,मतदार यादीतील नावाची प्रत,वीज बिल आणि उपलब्ध असल्यास मालमत्ता कराची पावती जोडावी.तसेच विहित नमुन्यातील शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे.

  दरम्यान शासनाच्या निर्धारित अटींनुसार,एका कुटुंबाला संपूर्ण महाराष्ट्रात केवळ एकच अतिक्रमण नियमित करता येणार आहे.अतिक्रमण नियमित झाल्यानंतर पाच वर्षे संबंधित जागेची विक्री,भाड्याने देणे,हस्तांतरण किंवा वापरबदल करता येणार नाही.ही प्रक्रिया केवळ पात्र निवासी बांधकामांसाठी लागू राहणार आहे.अतिक्रमण नियमित करण्याबाबतचा अंतिम निर्णय शासनाचे नियम,अटी व शर्ती तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मंजुरीनुसार घेतला जाणार आहे.त्यामुळे पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात सादर करावेत असे आवाहन नगराध्यक्ष पराग संधान व मुख्याधिकारी अजित निकत यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close